नंदूरबार l प्रतिनिधी
टेनिस क्रिकेट असोसिएशन महाराष्ट्र यांच्या मान्यतेने व नंदुरबार जिल्हा टेनिस क्रिकेट असोसिएशन यांच्या वतीने राज्यस्तरीय टेनिस क्रिकेट स्पर्धेसाठी दि.12ऑगस्ट 2023 रोजी नंदुरबार जिल्हा संघ निवड चाचणीचे आयोजन करण्यात आले आहे.
टेनिस क्रिकेट असोसिएशन महाराष्ट्र यांच्या वतीने दि.18 ते 20 ऑगस्ट 2023 दरम्यान उस्मानाबाद (धाराशिव ) येथे राज्यस्तरीय टेनिस क्रिकेट स्पर्धा होणार आहे. या स्पर्धेसाठी 17 वर्षा आतील गटात नंदुरबार जिल्ह्यातील मुले व मुली क्रीडा स्पर्धेत नंदुरबार जिल्हा संघामार्फत सहभागी होणार आहे. यासाठी दि.12 ऑगस्ट 2023 रोजी दुपारी 3 ते 5 वाजेपर्यंत नंदुरबार येथील विरल विहारजवळील आनंदी कृपा क्रिकेट क्लबच्या प्रांगणात नंदुरबार जिल्हा संघ निवड चाचणीचे आयोजन केले आहे. या निवड चाचणीत सहभागी होण्यासाठी खेळाडूंनी असोसिएशनचे नंदुरबार जिल्हा सचिव संदिप खलाणे (मो.9420917907) व दिनेश बैसाणे (मो.8668557158) यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन नंदुरबार जिल्हा टेनिस क्रिकेट असोसिएशनच्या वतीने करण्यात आले आहे.