Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

सातबारा व जमिनीच्या विविध प्रकारच्या नोंदींसाठी ‘ई-हक्क’ प्रणालीद्वारे अर्ज दाखल करा : जिल्हाधिकारी मनिषा खत्री

team by team
August 2, 2023
in राज्य
0
मतदारांनी घरी येणाऱ्या मतदान केंद्रस्तरीय अधिकाऱ्यांना सहकार्य करावे : जिल्हाधिकारी मनीषा खत्री

नंदुरबार l प्रतिनिधी

जमाबंदी  आयुक्त  कार्यालय (पुणे)  यांनी  ‘ई-हक्क’ नावाने नविन ऑनलाईन आज्ञावली विकसित केली असून सातबारा व जमीनीवरील विविध प्रकारच्या नोंदींसाठी या प्रणालीद्वारे अर्ज दाखल करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी मनिषा खत्री यांनी केले आहे.

या आज्ञावलीमध्ये अधिकार अभिलेखात आवश्यक त्या नोंदी गाव नमुना सातबारावर दाखल होण्यासाठी महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियमानुसार प्रतिवृत्त देण्यासाठी जो अर्ज करावा लागतो तो अर्ज तलाठी कार्यालयात न जाता घरी बसून हक्क प्रणालीद्वारे दाखल करता येण्याची सुविधा दिलेली आहे. तसेच याद्वारे सातबारा उताऱ्यावर अनोंदणीकृत नोंदी वारस नोंदी, मयताचे नाव कमी करणे, कर्जाचा बोजा कमी करणे, कर्जाचा बोजा चढविणे, अज्ञान पालनकर्ता शेरा कमी करणे, विश्वस्तांचे नाव बदलणे, एकत्र कुटूंब कर्त्यांची नोंद कमी करणे, सातबारा उताऱ्यातील चुका दुरुस्त करणे यासह इतर महत्वाच्या कामासाठी अर्ज दाखल करण्यासाठी ‘ई हक्क’ प्रणाली उपलब्ध करून दिली आहे.

सद्यस्थितीत फेरफार नोंदीसाठी तलाठ्यांकडे अर्ज दाखल करावा लागतो. तथापि, आता तलाठ्यांकडे न जाता या प्रणालीवर अर्ज दाखल करता येईल.

पहिल्या टप्प्यात ई-करार बोजा दाखल करणे, अनोंदणीकृत नोंदी वारस नोंदी, मयताचे नाव कमी करणे, कर्जाचा बोजा कमी करणे, कर्जाचा बोजा चढविणे, अज्ञान पालनकर्ता शेरा कमी करणे, विश्वस्तांचे नाव बदलणे, एकत्र कुटूंब कर्त्यांची नोंद कमी करणे, सातबारा उताऱ्यातील चुका दुरुस्ती फेरफार या प्रकारांसाठी खातेदार यांना या प्रणालीमधून अर्ज करता येणार आहे. यासाठी राष्ट्रीयकृत बँका, सहकारी सोसायटी व नागरिक यांना अर्ज करण्यासाठी bumps://pdcigr.Maharashtra.gov.in/frm: Login.aspx या संकेतस्थळावर आपले खाते तयार करणे आवश्यक आहे असेही प्रसिध्दी पत्रकानुसार कळविण्यात आले आहे.

बातमी शेअर करा
Previous Post

शेतकऱ्यांनी आपली ई-पिक नोंदणी करावी : जिल्हाधिकारी मनिषा खत्री

Next Post

सात ऑगस्ट रोजी होणार जिल्हास्तरीय लोकशाही दिन

Next Post
सात ऑगस्ट रोजी होणार जिल्हास्तरीय लोकशाही दिन

सात ऑगस्ट रोजी होणार जिल्हास्तरीय लोकशाही दिन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

पालिकेतर्फे महिला मेळावा; बचत गटांना धनादेश वितरणासह गुणवंतांचा सन्मान

पालिकेतर्फे महिला मेळावा; बचत गटांना धनादेश वितरणासह गुणवंतांचा सन्मान

March 10, 2026
विधी सेवा महाशिबिरातून नागरिकांच्या जीवनमानात बदल घडविण्याचा प्रयत्न : न्यायमूर्ती किशोर संत

विधी सेवा महाशिबिरातून नागरिकांच्या जीवनमानात बदल घडविण्याचा प्रयत्न : न्यायमूर्ती किशोर संत

March 10, 2026
डॉ. हिना गावित यांच्या हस्ते महिलांना भेट वस्तूंच वितरण

डॉ. हिना गावित यांच्या हस्ते महिलांना भेट वस्तूंच वितरण

March 10, 2026
माजी खा.डॉ. हिना गावित यांनी सिंहस्थ पर्वणी संदर्भात अधिकाऱ्यांकडून घेतला आढावा

माजी खा.डॉ. हिना गावित यांनी सिंहस्थ पर्वणी संदर्भात अधिकाऱ्यांकडून घेतला आढावा

March 10, 2026
भाजपातर्फे छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती साजरी

भाजपातर्फे छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती साजरी

March 7, 2026
डॉ.विक्रांत बाबा मित्र परिवारा मार्फत शिवजयंती उत्साहात साजरी

डॉ.विक्रांत बाबा मित्र परिवारा मार्फत शिवजयंती उत्साहात साजरी

March 7, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add