नंदुरबार l प्रतिनिधी
खरीप हंगाम-2023 ची पिक पाहणी नोंदणीसाठी पिक पाहणीचे 2.0.11 हे अपडेटेड व्हर्जन गुगल प्लेस्टोअरवर उपलब्ध असून जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी आपली ई-पिक पाहणी नोंदणी करून शासनाच्या विविध योजनांचा लाभ घ्यावा असे, आवाहन जिल्हाधिकारी मनिषा खत्री यांनी केले आहे.
ई-पिक पाहणी नोंदणीसाठी सर्व खातेदार शेतकऱ्यांनी नविन व्हर्जन अपडेट करून घेणे आवश्यक असून खरीप हंगामाची प्रत्यक्ष ई-पिक पाहणी मोबाईल अँपद्वारे नोंदणी सुरु आहे. यासाठी सर्व शेतकऱ्यांनी आपली ई-पिक पाहणी नोंदणी पूर्ण करुन घ्यावी, असेही प्रसिध्दीपत्रकानुसार कळविण्यात आले आहे.








