नंदूरबार l प्रतिनिधी
मोलगी येथे एका अल्पवयीन मुलीवर अत्याचार करुन तिला जीवे ठार मारल्याची घटना नुकतीच घडली आहे.विधान परिषदेचे सदस्य आमदार आमश्या पाडवी यांनी कुटुंबियांची भेट घेऊन त्यांचे सांत्वन केले.व या घटनेची सखोल चौकशी होऊन दोषींवर कारवाई होत नाही तो पर्यंत आपण स्वस्थ बसणार नसल्याचा विश्वास कुटुंबियांना दिला.
मोलगी येथील एका अल्पवयीन मुलीवर अत्याचार करुन तिला जीवे ठार मारण्यात आल्याची घटना नुकतीच घडली आहे.या घटनेतील दोषींवर पोलीसां कडुन योग्य ती चौकशी न करता पीडिताचा आत्महत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. पीडितेच्या पालकांनी दिलेल्या तक्रारी कडे पोलीसांनी योग्य पद्धतीने न पाहता दोषींना पाठीशी घालण्याचा प्रकार होत असल्याची तक्रार पीडितेच्या पालकांनी आमदार आमश्या पाडवी यांच्याकडे केली होती.
त्या अनुषंगाने पीडितेला व तिच्या कुटुंबियांना योग्य न्याय मिळावा यासाठी आमदार आमश्या पाडवी यांनी विधान परिषदेच्या सभागृहात आवाज उठविला होता त्यामुळे पोलीस अधिक्षक व पोलीस उप अधिक्षक यांनी मोलगी येथे भेट दिली होती व तीन संशयितांना अटक करण्यात आली. पीडितेला व तिच्या कुटुंबियांना योग्य न्याय मिळावा यासाठी आमदार आमश्या पाडवी यांनी कुटुंबियांची भेट घेऊन त्यांचे सांत्वन केले. व या घटनेतील दोषींवर जो पर्यंत पुर्ण कारवाई होत नाही तो पर्यंत आपण स्वस्थ बसणार नाही असा विश्वास दिला.
दरम्यान आमदार आमश्या पाडवी यांनी घटनास्थळी भेट देऊन घटनेची सविस्तर माहिती जाणुन घेतली तसेच ज्या ठिकाणी अल्पवयीन मुलीला मिठात ठेवण्यात आले आहे त्या ठिकाणी ही भेट दिली. आमदार आमश्या पाडवी यांनी थेट विधान परिषदेत या घटने संदर्भात आवाज उठविल्याने ग्रामस्थांमध्ये भेटीची मोठी उत्सुकता होती त्यामुळे पीडित मुलीच्या घरी मोठा जनसमुदाय उपस्थित होता.
यावेळी युवासेनेचे तालुका प्रमुख जयवंत पाडवी, विद्या पाडवी, मोलगी शहर प्रमुख सुनील वसावे, मोलगी शाखा प्रमुख रामसिंग वसावे, काठी शाखा प्रमुख श्रावण तडवी, जामली शाखा प्रमुख अजय तडवी, वेली शाखा प्रमुख दिलवरसिंग वसावे आदीं उपस्थित होते.