नंदूरबार l प्रतिनिधी
खरेदी विक्री संघाची शेतकऱ्यांमुळे प्रगतीकडे वाटचाल सुरू असून बळीराजाच्या शेतीला सोन्याचे दिवस आल्याने परिसरातील युवा हा नोकरी मागे न धावता शेती व्यवसायाकडे वळला व तो पारंपारिक शेती न करता आधुनिक शेती करत असून नवनवीन टेक्नॉलॉजीचा वापर करून तालुक्यातील केळी पपई दर्जेदार निर्यातक्षम उत्पादन घेऊन विक्रीसाठी साता समुंदर पार गेली असली तरी तालुक्यात ऊस हे पीक प्रमुख असल्याने त्याच्या उत्पन्नात भरघोस वाढीसाठी शेतकऱ्यांनी प्रयत्न करावा जेणेकरून आपले सहकार क्षेत्रातील संस्थां अधिक बळकट होऊन भरभराटी येऊन बळीराजाही सुजलम सुफलंम होईल शेतकरी सुखी तर जग सुखी हे ब्रीदवाक्य खरे ठरेल असा आपण सर्व मिळून निर्धार करू असे प्रतिपादन निझर तालुका खरेदी विक्री संघाचे चेअरमन डायाभाई चौधरी यांनी केले.
कुकरमुंडा ( गुजरात) तालुक्यातील बहुरूपा येथे अंबाजी मंदिर सभागृहात निझर तालुका खरेदी विक्री संघाची ६१ वा वार्षिक सर्वसाधारण सभा व पीक परिसंवाद अशा विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले अध्यक्षस्थानी खरेदी-विक्री संघाचे चेअरमन डायाभाई चौधरी होते तर प्रमुख अतिथी म्हणून जिल्हा मध्यवर्ती बँकेचे व्हाईस चेअरमन सुनील पटेल, जिल्हा बँकेचे संचालक दिलीप पाटील, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती योगेश राजपूत, अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे राज्यअध्यक्ष प्रा.एन.डी.पाटील, खरेदी विक्री संघाचे ज्येष्ठ संचालक शरद पाटील, निंबा पटेल कुकरमुंडा, कृषी उत्पन्न बाजार समितीचे चेअरमन घनश्याम पटेल, सुमूल डेअरीचे संचालक संजय सूर्यवंशी, गुजरात भूविकास बँकेचे चेअरमन सुरेश पटेल, दोडे गुजर समाजाचे अध्यक्ष यशवंत पटेल, कुकरमुंडा भाजपा तालुका अध्यक्ष अजय पटेल, कोषाध्यक्ष अंबालाल पटेल,पंचायत समितीचे उपसभापती छोटू न्हावी, तळोदा खरेदी विक्री संघाचे चेअरमन गोविंद पाटील,संचालक भरत पाटील,संजय चौधरी,अंतुरली उपसरपंच गणेश पाटील, ईश्वरलाल पटेल, खुशाल पटेल आदीं उपस्थित होते.
सर्वसाधारण सभेचे सूत्रसंचालन प्रास्ताविकात खरेदी-विक्री संघाचे सचिव रवींद्र पाटील यांनी सन २०२२/२३ या वर्षाचा संघाला होणारा नफा व तोटा चालू वर्षाचा बजेट व सहकार विभागातील नियमावलीत बदल करून संघातर्फे शेतकऱ्यांना उत्पादित केलेला माल सुरक्षित ठेवण्यासाठी कोल्ड स्टोरेज व विविध वस्तूंसाठी मॉलची निर्मिती करण्याचा मानस व्यक्त केला. यावेळी सर्व संचालक मंडळ सभासदांच्या परवानगीने सर्वानुमते मंजूर करण्यात आले यावेळी निझर तालुक्यातील सभासद शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.कार्यक्रमाचे आभार बहुरूपा अंबाजी मंदिर संस्थांनचे विश्वस्त मधुकर पटेल यांनी केले वार्षिक सभा यशस्वीतेसाठी बहुरूपा येथील प्रगतिशील शेतकरी श्रीराम पाटील, रवींद्र पटेल, भगवान पटेल, खरेदी विक्री संघाचे कर्मचारी राकेश पटेल गणेश चौधरी, शरद पटेल आदींसह नवयुवक मित्र मंडळाने परिश्रम घेतले.








