नंदूरबार l प्रतिनिधी
का.वि.प्र.संस्था भालेर संचलित श्रीमती क.पु.पाटील माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय भालेर ता.जि.नंदुरबार येथे डॉ. मच्छिंद्र कदम (विभागीय सहसंचालक नाशिक विभाग नाशिक )यांचा निरोप समारंभ
नवनिर्वाचित शिक्षणाधिकारी प्रवीण जी.अहिरे यांचा स्वागत समारंभ आयोजित करण्यात आला होता.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रवीणअहिरे होते. प्रमुख पाहुणे व सत्कारमूर्ती डॉ. मच्छिंद्र कदम ,कांतीलाल नेरे संस्थापक अध्यक्ष भास्करराव हिरामण पाटील, संस्थेचे उपाध्यक्ष चंद्रशेखर पाटील, संस्थेचे सचिव भिका पाटील,एन.डी. नांद्रे , वासुदेव पाटील,रमेश पाटील, के.डी. बच्छाव, सरपंच सौ.शोभा पाटील, होळ येथील पालक धनराज धनगर ,फकीरा पाटील,माजी पर्यवेक्षक प्रल्हाद बागुल,विद्यालयाच्या प्राचार्य विद्या चव्हाण , मुख्याध्यापक एस. जी.सैदाणे, पर्यवेक्षक अनिल कुवर हे प्रमुख पाहुणे होते.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला कार्यक्रमाचे अध्यक्ष व प्रमुख पाहुणे यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करण्यात आले. डॉक्टर मच्छिंद्र कदम यांचा भास्कर पाटील यांच्या हस्ते शॉल बुके भेटवस्तू देऊन सत्कार करण्यात आला. विद्यालयाच्या वतीने प्राचार्य सौ. विद्या चव्हाण व पर्यवेक्षक अनिल कुवर यांच्या हस्ते साहेबांचा सत्कार करण्यात आला.
प्रास्ताविक सूर्यवंशी यांनी केले मनोगत माजी प्राचार्य एन.डी. नांद्रे , प्राचार्य सौ.विद्या चव्हाण, माजी पर्यवेक्षक प्रल्हाद बागुल, मुख्याध्यापक एस. जी.सैदाणे, डॉ. मच्छिंद्र कदम, प्रवीण अहिरे यांनी अध्यक्षीय भाषण केले. त्यात त्यांनी शालेय प्रसन्न परिसर भौतिक सुविधा व शाळेच्या गुणवत्ता विकास याबाबत समाधान व्यक्त केले.








