नंदुरबार l प्रतिनिधी

येथील आम आदमी पार्टी च्या शेतकरी आघाडीचे प्रदेशाध्यक्ष बिपिन पाटील यांच्यासह राज्यातील विदर्भ ,उत्तर महाराष्ट्र , मराठवाडा विविध जिल्ह्यांमधील शेतकरी आघाडीचे पदाधिकारी व शेकडो कार्यकर्त्यांनी आम आदमी पार्टी च्या शेतकरी आघाडीला रामराम ठोकून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात आज मुंबई येथे पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या हस्ते व विविध मान्यवरांच्या उपस्थितीत प्रवेश केला. त्यावेळी सर्व मान्यवरांचे प्रवेशाबद्दल स्वागत करण्यात आले.
या कार्यक्रमात सरचिटणीस हेमंत टकले, राष्ट्रवादी युवक काँग्रेस प्रदेशाध्यक्ष मेहबूब शेख, प्रदेश सरचिटणिस संदीप बेडसे, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष माजी आमदार उदेसिंग पाडवी, तळोदा तालुका अध्यक्ष संदीप परदेशी, शहराध्यक्ष योगेश मराठे, बाजार समितीचे उपसभापती हितेंद्र क्षत्रिय, धर्मराज पवार, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष नितीन जगताप अक्कलकुवा येथील करीम बलोच यांच्यासह विविध जिल्ह्यातील पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
यावेळी बिपिन पाटील म्हणाले की माझ्यासोबत आलेले सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या ध्येयधोरणासोबत व पक्ष वाढीसाठी व यासोबत शेतकऱ्यांच्या प्रश्न सोडविण्यासाठी सदैव तत्पर राहतील असे त्यांनी सांगितले यावेळी संदीप बेडसे यांनी मार्गदर्शन केले.









