खेतिया l प्रतिनिधी
मणिपूर राज्यातील जिल्हा कंगपोकपी येथे झालेल्या आदिवासी महिला व मुलींवर सामुहीक बलात्कार व अत्याचार प्ररकणी सदरील आरोपींना अटक करून सक्षम पोलीस यंत्रणेमार्फत सदर घटनेची सखोल चौकशी करण्यात यावी व सदरील खटला जलदगती न्यायालयात चालविण्यात यावा अशी मागणी शहादा तालुका वकील संघातर्फे करण्यात आली आहे.
शहादा प्रांत अधिकारी यांना देण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे की, मणिपूर राज्यातील कंगपोकपी जिल्ह्यात आदिवासी महिला व मुलीला विवस्त्र करून सर्व गावभर फिरविले तसेच सार्वजनीक जागेवर दोघांना विवस्त्र फिरविले .सदरील महिला व मुलगी आदिवासी असल्याने म्हणून आरोपींनी सदरील निंदणीय व लज्जास्पद कृत्य केलेले आहे. तसेच स्त्री जातीस घृणा व लज्जा वाटावी अशी कृती आरोपींनी महिलांसोबत त्यांचे नातेवाईकांसमक्ष केलेली असल्याने सदरील घटना निंदणीय असल्यामुळे तसेच सदर गुन्हयात १०० पेक्षा जास्त लोकं सामिल असल्याने सर्व आरोपींना अटक करून, सक्षम पोलीस यंत्रणेमार्फत सदरील घटनेचा सखोल तपास करण्यात यावा.
आरोपींविरूध्द फास्ट्रॅक कोर्टमध्ये खटला चालवून संबंधीत आरोपींना फाशीची शिक्षा देण्यात यावी. सदरील घटनेमुळे सर्व भारतीयांची जगात नाचक्की झाली असून पुन्हा अशी घटना होवू नये याची देखील या निवेदनाद्वारे पुर्व सुचना देण्यात येत आहे. भारतीय संविधानाचे अनुच्छेद १७ नुसार अस्पृश्यता पाळणे गुन्हा असून देखील अशा घटना वारंवार घडत आहेत. याबाबत देखील शासनाने लक्ष देवून कठोर कायदा करण्याची गरज आहे. आदिवासी समाजामध्ये सदरील घटनेबाबत खुप चिड असून सर्व भारतीयांना लाजविणारी व आदिवासी समाजाबद्दल व स्त्रीयांबद्दल अपमानास्पद व लज्जास्पद घटना घडलेली आहे. म्हणून या घटनेचा आम्ही तिव्र निषेध नोंदवत आहोत.
वरील नमुद घटनेत सामील असलेले आरोपींवर कारवाई न झाल्यास नाईलाजास्तव आम्हाला मणिपूर राज्य सरकार व केंद्र सरकार विरूध्द धडक मोर्चा काढावा लागेल असा ईशारा निवेदनाद्वारे देण्यात आला आहे. निवेदनावर शहादा तालुका वकील संघाचे पदधिकारी ॲड. डी.एम.महिरे, ॲड. के. आर. वळवी, ॲड. एस. एस. कुवर, ॲड. एम. के.वसावे, ॲड.एस.जे. महिदे, ॲड. आर. पी. पावरा, ॲड.सी.जे.पावरा, ॲड. अशोक खर्डे, ॲड. के. डी. सोनार यांच्या सह्या आहेत.