शहादा l प्रतिनिधी
मणिपूर घटनेच्या निषेधार्थ आज आयोजित बंदला नंदुरबार जिल्ह्यातील सर्व आंबेडकरी समाज सामाजिक कार्यकर्ते, राजकीय कार्यकर्ते यांच्यासह आरपीआय आठवले गटातर्फे पाठिंबा जाहीर करण्यात आला आहे.
मणिपूर येथील आदिवासी समाजातील महिलांवर झालेल्या अमानूष अत्याचाराच्या घटनेचा निषेध व्यक्त करून मानवतेला काळीमा फासणा-या या घटने प्रकरणी दोषींवर कठोर कारवाई करावी. माता भगिनींची धिंड काढणाऱ्या क्रूर नराधामां विरोधात आयोजित नंदुरबार जिल्हा बंदला नंदुरबार जिल्ह्यातील आंबेडकरी जनता, आंबेडकरी समाज, सामाजिक संघटना, राजकीय संघटनांनी पाठिंबा दिला आहे.
महिलांवर अत्याचार करणाऱ्या क्रूर नराधमांना फाशीची शिक्षा झालीच पाहिजे असा ठराव पाठिंबा देण्यासाठी झालेल्या बैठकी दरम्यान करण्यात आला आहे.अशी माहिती अरविंद कुवर,माजी उपनगराध्यक्ष तथा जिल्हाध्यक्ष, आरपीआय आठवले गट, नंदुरबार जिल्हा यांनी दिली आहे.