नंदूरबार l प्रतिनिधी
नंदुरबार तालुक्यातील वनपरिक्षेत्र अधिकारी सामाजिक वनीकरण नंदुरबार यांच्या रस्ता दुतर्फा वृक्ष लागवड या कामांची तपासणी केली उपजिल्हाधिकारी रोहयो विभाग गोविंद दानेज यांनी केली.
तपासणी दरम्यान उपजिल्हाधिकारी यांनी कामांबाबत सहानुभूतीपूर्वक प्रशंसा केली. परंतु त्यांनी काही छोट्या मोठ्या त्रुट्याही यंत्रणाच्या अधिकारी कर्मचारी यांना दुरुस्त करण्याबाबत सूचना दिल्या. तसेच रस्ता दुतर्फ वृक्ष लागवड करताना दोन्ही साईडला जे रोप लागवड करणार ती रोप शेतकऱ्यांनी पसंती दाखवलेल्या रोपांची लागवड करावी असेही सांगितले.
यावेळी जिल्हा समन्वयक संदीप निकम यांनीही कामांबाबत व मजुरांना पगार वेळेवर मिळतो का याबाबत मजुरांकडून खात्री करून घेतली. कामाचा दर्जा चांगला दिसून आल्यामुळे उपजिल्हाधिकारी यांनी वनपाल सोनाली बोरसे, तांत्रिक अधिकारी संदीप वाडीले व मिलिंद वळवी यांचीही प्रशंसा केली.कामाच्या ठिकाणी रोजगार सेवक हेही उपस्थित होते.








