नंदूरबार l प्रतिनिधी
प्रकाशा -तळोदा रस्त्यावर राज्य उत्पादन शुल्क सिमा तपासणी नाका पथकाने अवैधपणे परराज्यातील मद्याची वाहतुक करतांना टाटा आयशर वाहनासह ४८ लाख ४ हजाराचा क मुददेमाल जप्त केला आहे
मिळालेल्या गुप्त माहितीनुसार प्रकाशा ते तळोदा रस्त्यावर टाटा आयशर चारचाकी वाहन (क्र.जी ए .११, टी.२२२७) या वाहनाची तपासणी केली असता सदर वाहनामध्ये रॉयल ब्ल्यू व्हिस्की 180 मि.ली. क्षमतेच्या एकुण 42 हजार 240 पेटी बाटल्या (880 बॉक्स) गोवा राज्य निर्मित विक्रीसाठी व महाराष्ट्र राज्यात प्रतिबंधित असलेला मद्यसाठा मिळून आला. सदर वाहनाचे चालक व क्लिनर अंधाराचा फायदा घेत वाहन व मद्य सोडून पळून गेले.
घटनास्थळी आयशर चारचाकी वाहन मद्यासह एकुण रू. ४८ लक्ष ४ हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. सदर गुन्हयातील मुख्य सुत्रधार फरार आहे. सदरची कारवाई महाराष्ट्र दारुबंदी कायदा 1949 अंतर्गत करण्यात आली. सदरची कार्यवाही प्र.निरीक्षक डी.बी.कोळपे, निरिक्षक डी.एम. चकोर, दुय्यम निरिक्षक एस.आर. इंगळे, एस. आर. नजन, तसेच स.दु.नि. आर एल राजपुत, जवान आर एन पावरा, एम. के. पवार, बी. एम. चौधरी, एच.पी.जेठे, एस.सी. बैसाने, एम. एन. पाडवी यांनी केली. सदर गुन्ह्याचा पुढील तपास डी.बी.कोळपे प्र. निरीक्षक राज्य उत्पादन शुल्क सिमा तपासनी नाका खेडदिगर हे करीत आहेत.