Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

जनसहभागातून होणाऱ्या वृक्ष रोपण मोहिमेचा शुभारंभ

team by team
July 5, 2023
in राज्य
0
जनसहभागातून होणाऱ्या वृक्ष रोपण मोहिमेचा शुभारंभ

नंदूरबार l प्रतिनिधी

 

 

योजक संस्था, नंदुरबार डिस्ट्रिक डेव्हलपमेंट कौन्सिल व वात्सल्य समिती नंदुरबार,यांच्या संयुक्त विद्यमाने नंदुरबार जिल्ह्याच्या रौप्य महोत्सवानिमित्त जिल्ह्यातील प्रत्येक गाव व पाड्यावर एकूण 25 हजार वृक्ष लागवडीचे नियोजन पूर्ण झाले आहे.या साठी सुहाना मसाला यांचे विशेष सहकार्य लाभले व सर्व वृक्ष नंदुरबार येथे दाखल झालेत. या सर्व वृक्षांच्या वृक्ष पुजनाचा कार्यक्रम पातोंडा येथील सरदार पटेल शैक्षणिक संकुल येथे आयोजीत केला होता.

 

 

या प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून या संस्थेचे चेयेरमन ॲड. प्रभाकर पटेल,प पू संत तारादासजी बापू,भागवत कथाकार अविनाश महाराज,आप की जय संप्रदाय प्रमुख जितू पाडवी,स्वाध्याय परिवाराचे संतोष जाधव,वारकरी संप्रदाय प्रमुख ह.भ.प ज्ञानेश्वर महाराज,राष्ट्रीय स्वयंसेवक संघ जिल्हा संघ चालक गुलाबसिंग वसावे, योजकचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ.गजानन डांगे,वात्सल्य सेवा समिती अध्यक्ष पंकज पाठक आदी उपस्थित होते.

 

 

कार्यक्रम प्रास्ताविकात डॉ.गजानन डांगे यांनी भूमी सुपोषण, पर्यावरण क्षेत्रात जिल्ह्याची सद्य स्थिती यावर प्रकाश टाकत C-20अंतर्गत या विषयी जागतिक पातळीवरील कार्य व भारताची भूमिका या बाबत माहिती दिली.दादा शिनगर यांनी जिल्हाभर झाड वितरणाचे नियोजन, डेपो, वाहतूक व्यवस्था, जिओ टेगिंग ई बाबत सविस्तर माहिती दिली.या नंतर मान्यवरांच्या हस्ते वृक्ष पूजन अतुल अग्निहोत्री महाराज यांनी संपन्न केले.

 

 

आशिर्वचन “पर मनो गतात” सर्व संत व्यक्तींनी वेद शास्त्र , पुराण,अभंग ई. मध्ये पर्यावरण संवर्धनाचे दाखले देत या उपक्रमाचे कौतुक केले व संपर्कातील भाविकांना या बाबत जागरकता निर्माण करण्याचे आश्वासन दिले. या कार्यक्रमाचे सूत्र संचालन पुरुषोत्तम काळे यांनी केले तर आभार पंकज पाठक यांनी मानले.या कार्यक्रमास जिल्हा भरातून या अभियानातील सहभागी व्यक्ती, शहरातील लायन्स, रोटरी, इंजिनियर असोसिएशन ,डॉक्टर असोसिएशन ई संघटनांचे सदस्य उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी श्री.पाटील, आर्कि.नीरज देशपांडे,आशिष वाणी,ज्ञानेश्वर राजपूत राम दाऊतखाने महेश जोशी,मंगेश उपासनी,प्रशांत पाटील आदींनी परिश्रम घेतले.

बातमी शेअर करा
Previous Post

भीषण अपघात : कंटेनरचे ब्रेक फेल झाल्याने दुचाकी, कारला उडवत थेट हॉटेलमध्ये शिरला. 10 जणांचा मृत्यू, शिरपूर येथे झाले शवविच्छेदन

Next Post

जिल्ह्यात शस्त्रबंदी व जमावबंदी आदेश जारी

Next Post
जिल्ह्यात शस्त्रबंदी व जमावबंदी आदेश जारी

जिल्ह्यात शस्त्रबंदी व जमावबंदी आदेश जारी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

पालिकेतर्फे महिला मेळावा; बचत गटांना धनादेश वितरणासह गुणवंतांचा सन्मान

पालिकेतर्फे महिला मेळावा; बचत गटांना धनादेश वितरणासह गुणवंतांचा सन्मान

March 10, 2026
विधी सेवा महाशिबिरातून नागरिकांच्या जीवनमानात बदल घडविण्याचा प्रयत्न : न्यायमूर्ती किशोर संत

विधी सेवा महाशिबिरातून नागरिकांच्या जीवनमानात बदल घडविण्याचा प्रयत्न : न्यायमूर्ती किशोर संत

March 10, 2026
डॉ. हिना गावित यांच्या हस्ते महिलांना भेट वस्तूंच वितरण

डॉ. हिना गावित यांच्या हस्ते महिलांना भेट वस्तूंच वितरण

March 10, 2026
माजी खा.डॉ. हिना गावित यांनी सिंहस्थ पर्वणी संदर्भात अधिकाऱ्यांकडून घेतला आढावा

माजी खा.डॉ. हिना गावित यांनी सिंहस्थ पर्वणी संदर्भात अधिकाऱ्यांकडून घेतला आढावा

March 10, 2026
भाजपातर्फे छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती साजरी

भाजपातर्फे छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती साजरी

March 7, 2026
डॉ.विक्रांत बाबा मित्र परिवारा मार्फत शिवजयंती उत्साहात साजरी

डॉ.विक्रांत बाबा मित्र परिवारा मार्फत शिवजयंती उत्साहात साजरी

March 7, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add