Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

भीषण अपघात : कंटेनरचे ब्रेक फेल झाल्याने दुचाकी, कारला उडवत थेट हॉटेलमध्ये शिरला. 10 जणांचा मृत्यू, शिरपूर येथे झाले शवविच्छेदन

team by team
July 4, 2023
in क्राईम
0
भीषण अपघात : कंटेनरचे ब्रेक फेल झाल्याने दुचाकी, कारला उडवत थेट हॉटेलमध्ये शिरला. 10 जणांचा मृत्यू, शिरपूर येथे झाले शवविच्छेदन
नंदूरबार l  प्रतिनिधी –
 शिरपूर तालुक्यातील पळासनेरनजीक मुंबई -आग्रा राष्टीय महामार्गावर आज भीषण अपघात झाला. खडी घेऊन जाणाऱ्या भरधाव कंटेनरचे ब्रेक फेल झाल्याने दुचाकी, कारला उडवत थेट हॉटेलमध्ये शिरला. या अपघातात 10 जण ठार झाले असून 19 जण जखमी झाले आहेत. दरम्यान, मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे.
समृध्दी महामार्गावरील अपघाताची घटनेला दोन दिवस उलटत असतांनाच धुळे जिल्हयातील मुंबई-आग्रा महामार्गावरील शिरपूर तालुक्यातील पळासनेर गावाजवळ मंगळवारी सकाळी भीषण अपघात झाला. मध्यप्रदेशातून खडी भरुन येत असलेल्या ट्राला ट्राला  (क्र.आरजे०९, जीबी.९००१) ने चालकाचा वाहनांवरील ताबा सुटल्याने महामार्गावर पुढे चालणा-या कारला जोरदार धडक देत रस्त्याच्या कडेला असलेल्या हॉटेल सदगुरु मध्ये शिरला. यावेळी चहा-नाश्तासाठी थांबलेल्या प्रवाशांना तसेच बस थांब्यावर उभ्या असलेल्या विद्यार्थी व प्रवाशांना चिरडून टाकले. या घटनेनंतर मृतदेहांचा खच पाहून काहीकाळ परिसर सुन्न झाला होता. या भिषण अपघातांत दहा जण ठार झाले असून १९ जण जखमी झाले आहेत.
या अपघातातील मृतांची नावे
कन्हैयालाल बंजारा (ट्राला चालक),सुरपालसिंग दिवानसिंग राजपूत (सहचालक) दोन्ही रा. गामपंचायत जावदा, जि.चितोडगड, भिलवाडा, प्रतापसिंग भिमसिंग गिरासे (वय ७०)  रा.पळासनेर ता.शिरपूर, दशरत कमल पावरा (वय २२) रा.पळासनेर ता.शिरपूर, गीता मुरी पावरा (वय १५), मुरी सुरसिंग पावरा (वय २८),संजय जायमय पावरा (वय ३८), रितेश संजय पावरा (वय १०) सर्व राहणार कोळसापाणी, ता.शिरपूर खिरमा डेबरा कनोजे (वय १० रा.आंबापाणी ता.शिरपूर जि.धुळे), सुनिता राजेश खंडेलवाल रा.गणपती मंदिर जीटीपी स्टॉपजवळ देवपूर धुळे, तसेच १९ जण जखमी असून चार जणांवर शिरपूर उपजिल्हा रुग्नालयात उपचार सुरु आहेत. तर उर्वरित १५ जणांवर धुळे जिल्हा रुग्नालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. जखमींमध्ये हॉटेल चालक बिजलान दारसिंग पावरा, दिनेश नारशा पावरा, गिता पावरा, ललीता रमेश पावरा, अनिता पावरा, दिपक मगन पावरा, नंदीनी पावरा, अजय पावरा, सुमित्रा खंडू पावरा, अमरसिंग पावरा, अर्जुन पावरा हे सर्व कोळसापाणी ता.शिरपूर येथील रहिवासी होते. तर हेमराज जाधव (रा.नाशिक) यांच्यासह अन्य जणांचा समावेश आहे.
 या वाहनांचे झाले नुकसान
ट्राला (क्रमांक आर जे०९.जीबी.९००१) ने वाहनांना दिली धडक, (एमएच १८, बीएस.७६९२) हिरोहोंडा मोटारसायकल, (एमपी११.एमच१६३५) हिरोहोंडा डिलक्स मोटारसायकल , (एमपी ४६. एमएफ. ४२२१) हिरोहोंडा स्पेलंडर, (एमएच१५.एएच १०७०) माललवाहू पिकअप, (एमएच३९.आर४६८७) हिरोहोंडा डिलक्स मोटारसायकल,  (एमपी११, टीआर.बीजे.४३३२)नवीन स्कूल बस, नंबर नसलेली हिरो होंडा स्प्लेंडर, (एमएच१८.बीआर ५०७५) हुंदाई कार
घटनास्थळी धुळे जिल्हाधिकारी जलज शर्मा, जिल्हा पोलीस अधीक्षक संजय बारकुंड, विभागीय पोलीस अधीक्षक सचिन हिरे यांच्यासह शिरपूर तालुका, शिरपूर शहर, नरडाणा पोलीस ठाण्याचे पोलीस अधिकारी व कर्मचारी दाखल झाले होते. यावेळी शिरपूर उपजिल्हा रुग्णालयात जिल्हाधिकारी जलज शर्मा यांनी भेट देऊन जखमींची विचारपूस केली. अपघातातील मृत व जखमींना शासनातर्फे योग्य तो मोबदला देण्याचे काम सुरू आहे. या घटनेची माहिती शासनाला कळविली आहे. असेही जिल्हाधिकारी शर्मा यांनी माध्यमांना माहिती देतांना सांगितले.
बातमी शेअर करा
Previous Post

धुळे-पळासनेर येथील अपघाताबद्दल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून शोक व्यक्त; मृतांच्या नातेवाईकांना ५ लाखांची मदत

Next Post

जनसहभागातून होणाऱ्या वृक्ष रोपण मोहिमेचा शुभारंभ

Next Post
जनसहभागातून होणाऱ्या वृक्ष रोपण मोहिमेचा शुभारंभ

जनसहभागातून होणाऱ्या वृक्ष रोपण मोहिमेचा शुभारंभ

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

पालिकेतर्फे महिला मेळावा; बचत गटांना धनादेश वितरणासह गुणवंतांचा सन्मान

पालिकेतर्फे महिला मेळावा; बचत गटांना धनादेश वितरणासह गुणवंतांचा सन्मान

March 10, 2026
विधी सेवा महाशिबिरातून नागरिकांच्या जीवनमानात बदल घडविण्याचा प्रयत्न : न्यायमूर्ती किशोर संत

विधी सेवा महाशिबिरातून नागरिकांच्या जीवनमानात बदल घडविण्याचा प्रयत्न : न्यायमूर्ती किशोर संत

March 10, 2026
डॉ. हिना गावित यांच्या हस्ते महिलांना भेट वस्तूंच वितरण

डॉ. हिना गावित यांच्या हस्ते महिलांना भेट वस्तूंच वितरण

March 10, 2026
माजी खा.डॉ. हिना गावित यांनी सिंहस्थ पर्वणी संदर्भात अधिकाऱ्यांकडून घेतला आढावा

माजी खा.डॉ. हिना गावित यांनी सिंहस्थ पर्वणी संदर्भात अधिकाऱ्यांकडून घेतला आढावा

March 10, 2026
भाजपातर्फे छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती साजरी

भाजपातर्फे छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती साजरी

March 7, 2026
डॉ.विक्रांत बाबा मित्र परिवारा मार्फत शिवजयंती उत्साहात साजरी

डॉ.विक्रांत बाबा मित्र परिवारा मार्फत शिवजयंती उत्साहात साजरी

March 7, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add