शहादा l प्रतिनिधी
पूज्य साने गुरुजी विद्या प्रसारक मंडळाचे औषधनिर्माणशास्त्र महाविद्यालयाच्या (डी.फार्मसीच्या) विद्यार्थ्यांनी यशाची परंपरा कायम राखत घवघवीत यश संपादन केले.
महाराष्ट्र राज्य तंत्र शिक्षण मंडळ मुंबई तर्फे औषधनिर्माणशास्त्र पदविका (डी.फार्मसी) परीक्षेचा शैक्षणिक वर्ष 2022 -23 चा निकाल नुकताच जाहीर झाला असून त्यात महाविद्यालयात अंतिम वर्षात प्रथम क्रमांक पाटील हर्षला कैलास 77.36 टक्के , द्वितीय क्रमांक व्यास राधिका भरत 76.27 टक्के, तृतीय क्रमांक पाटील धनश्री विलास 75.91 टक्के गुण मिळवून उत्तीर्ण झाले. तसेच प्रथम वर्षात प्रथम क्रमांक राजपुरोहित रिंकू दयालसिंग 70.8 टक्के, द्वितीय क्रमांक छाजेड ऋषभ ललितकुमार 69.90 टक्के, तृतीय क्रमांक पिंजारी मारिया फारूख व पवार दिव्या किशोर यांना प्रत्येकी 67.60 टक्के गुण मिळवून उत्तीर्ण झाले. उत्तीर्ण झालेल्या सर्व विद्यार्थ्यांनी आपले यशाचे श्रेय प्राचार्य डॉ.एस.पी.पवार, सर्व प्राध्यापक व शिक्षकेत्तर कर्मचारी वृंद यांना दिले.
उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांच्या यशस्वीतेबद्दल पूज्य साने गुरुजी विद्या प्रसारक मंडळाचे अध्यक्ष दीपक पाटील, उपाध्यक्ष जगदीश पाटील, मानद सचिव श्रीमती कमलताई पाटील, शैक्षणिक व सामान्य प्रशासन विभागाचे समन्वयक प्रा.मकरंद पाटील, कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक मयूर दीपक पाटील, प्राचार्य डॉ.एस.पी.पवार यांनी अभिनंदन केले. सर्व विद्यार्थ्यांना प्राचार्य डॉ.एस.पी.पवार, डी.फार्मसीचे विभाग प्रमुख प्रा.गिरीष बडगुजर, प्रा.माधुरी पवार, प्रा.चेतन पटेल, प्रा.प्रिया चौधरी, प्रा.के.पी. पाटील व शिक्षकेत्तर कर्मचारी वृंद यांचे मार्गदर्शन लाभले.