Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

गुरु हा आध्यात्मिक शिक्षक,मार्गदर्शक असतो : पंकज पाठक

team by team
July 4, 2023
in शैक्षणिक
0
गुरु हा आध्यात्मिक शिक्षक,मार्गदर्शक असतो : पंकज पाठक
नंदूरबार l प्रतिनिधी
     गुरु हा विशेषता आध्यात्मिक शिक्षक किंवा मार्गदर्शक असतो जो त्यांच्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन, शहाणपण, ज्ञान प्रदान करतो. नंदुरबार येथील श्रीमती दुर्गाबाई रघुवंशी हायस्कूलमध्ये गुरुपौर्णिमा निमित्त कार्यक्रमाचे अध्यक्ष शाळेचे उपमुख्याध्यापक पंकज पाठक बोलत होते.
प्रारंभी गुरु व्यास यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. या कार्यक्रम प्रसंगी  प्रमुख पाहुणे म्हणून लायन्स क्लबचे अध्यक्ष शत्रुघ्न बालानी, लायन्स क्लबचे कोषाध्यक्ष शंकर रंगलानी हे उपस्थित होते. तसेच मंचावर यावेळी शाळेचे मुख्याध्यापक सुभाष चौधरी, पर्यवेक्षक विपुल दिवाण, दिनेश वाडेकर  यांची प्रमुख उपस्थिती होती. विद्यार्थ्यांनी आयोजित केलेल्या कार्यक्रमात विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना पंकज पाठक पुढे म्हणाले की गुरु हा शिष्याच्या वैयक्तिक अडथळे दूर करण्यास, त्यांची शक्ती विकसित करण्यास आणि एक व्यक्ति म्हणून वाढवण्यास मदत करू शकतो आज मी इथे उभा आहे ते माझ्या गुरूंमुळे अशा तऱ्हेने आपल्या गुरूंबद्दल गौरव उद्गार काढले.
     याप्रसंगी प्रमुख पाहुणे शंकर रंगलानी यांनी म्हटले की, आम्ही शिकून किती ही मोठे झालो तरी गुरुचे महत्व कमी होत नाही गुरुने तुम्हाला योग्य रस्ता दाखविला आहे. अशा आपल्या या विचारातून गुरूंची महती गायली .
      यावेळी विविध स्पर्धा घेण्यात आल्या. त्यात इयत्ता सहावी ते सातवी साठी वकृत्व स्पर्धा तर इयत्ता आठवी ते दहावी साठी निबंध स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते .
 वकृत्व स्पर्धा इयत्ता 6 वी गट
1 दक्ष सोनवणे , 2मनीष खलाणे, वकृत्व स्पर्धा इयत्ता 7 वी गट,1 मुस्तफा पीरजादा, 2 हर्षवर्धन शिंदे,
निबंध स्पर्धा इयत्ता 8 वी गट
1 वेदांत पाटील
2 रोशन पाटील
3 प्रतीक गोसावी
निबंध स्पर्धा इयत्ता 9 वी गट
1 सार्थक पवार
2 गुरुदीप गवळी
3 सुमित पाटील
निबंध स्पर्धा इयत्ता 10 वी गट
1 मोहित नरभवर
2 धीरज नंदुरकर
3 मनोज पाटील
     या विद्यार्थ्यांनी यश संपादन केले. या सर्व यशस्वी विद्यार्थ्यांना लायन्स क्लब तर्फे बक्षीस देण्यात आले .तसेच लायन्स क्लब तर्फे सर्व शिक्षकांचा देखील सत्कार करण्यात आला.    याप्रसंगी विद्यार्थ्यांनी विविध ऋषीमुनी व संतांची वेशभूषा परिधान करून कार्यक्रमात जिवंतपणा आणला .
     निबंध स्पर्धेसाठी मिलिंद चव्हाण, सुहास वळवी, दिपाली भदाणे, तर वकृत्व स्पर्धेसाठी प्रशांत जानी, योगिता साळी ,कमल चौरे ,यांनी परीक्षण केले .कार्यक्रमाचे यशस्वीतेसाठी हेमंत खैरनार ,योगेश गवते ,भरत पेंढारकर ,देवेंद्र कुलकर्णी, अशोक वसईकर, विशाल मच्छले, प्रशांत पाटील, रवींद्र पाटील, तुषार नांद्रे, यांनी परिश्रम घेतले .कार्यक्रमाचे सूत्रसंचलन स्मित बोरसे ,प्रास्ताविक मोहित नरभवर ,बक्षीस यादी वाचन सार्थक पवार तर आभार प्रदर्शन मितेश वायकर या विद्यार्थ्यांनी केले. कार्यक्रमाला सर्व शिक्षक वृंद कर्मचारी बंधू उपस्थित होते.
बातमी शेअर करा
Previous Post

नंदूरबार शहरातील वादग्रस्त फलक तत्काळ काढा, भाजपाची जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी

Next Post

आषाढी एकादशी व बकरी ईद च्या निमित्ताने केलेल्या उत्कृष्ट कामगिरी बद्दल नंदुरबार जिल्हा पोलीसांचा केला गौरव

Next Post
आषाढी एकादशी व बकरी ईद च्या निमित्ताने केलेल्या उत्कृष्ट कामगिरी बद्दल नंदुरबार जिल्हा पोलीसांचा केला गौरव

आषाढी एकादशी व बकरी ईद च्या निमित्ताने केलेल्या उत्कृष्ट कामगिरी बद्दल नंदुरबार जिल्हा पोलीसांचा केला गौरव

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

पालिकेतर्फे महिला मेळावा; बचत गटांना धनादेश वितरणासह गुणवंतांचा सन्मान

पालिकेतर्फे महिला मेळावा; बचत गटांना धनादेश वितरणासह गुणवंतांचा सन्मान

March 10, 2026
विधी सेवा महाशिबिरातून नागरिकांच्या जीवनमानात बदल घडविण्याचा प्रयत्न : न्यायमूर्ती किशोर संत

विधी सेवा महाशिबिरातून नागरिकांच्या जीवनमानात बदल घडविण्याचा प्रयत्न : न्यायमूर्ती किशोर संत

March 10, 2026
डॉ. हिना गावित यांच्या हस्ते महिलांना भेट वस्तूंच वितरण

डॉ. हिना गावित यांच्या हस्ते महिलांना भेट वस्तूंच वितरण

March 10, 2026
माजी खा.डॉ. हिना गावित यांनी सिंहस्थ पर्वणी संदर्भात अधिकाऱ्यांकडून घेतला आढावा

माजी खा.डॉ. हिना गावित यांनी सिंहस्थ पर्वणी संदर्भात अधिकाऱ्यांकडून घेतला आढावा

March 10, 2026
भाजपातर्फे छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती साजरी

भाजपातर्फे छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती साजरी

March 7, 2026
डॉ.विक्रांत बाबा मित्र परिवारा मार्फत शिवजयंती उत्साहात साजरी

डॉ.विक्रांत बाबा मित्र परिवारा मार्फत शिवजयंती उत्साहात साजरी

March 7, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add