नंदूरबार शहरातील वादग्रस्त फलक तत्काळ काढा, भाजपाची जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी
नंदूरबार l प्रतिनिधी
नंदुरबार शहरातील कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी शहरातील वादग्रस्त फलक काढण्यात यावा अशी मागणी भाजपचे महामंत्री तथा जिल्हाध्यक्ष विजय चौधरी यांनी निवेदनाद्वारे केली असून, जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले आहे.
नंदूरबार शहरात प्रभाग क्र.१७ येथे वादग्रस्त फलक काही समाज कंटकांनी बेकायदेशीररीत्या उभा केला आहे. या वादग्रस्त फलकावरून शहरात सातत्याने तणावग्रस्त वातावरण निर्माण होत असून, फालकावर दर्शवण्यात आलेला राजा हा भारताचा कधीही आदर्श नव्हता.हिंदू बांधवांच्या धार्मिक भावना तसेच त्यांचे अस्मिता दुखावणारी बाब आहे.
याची दखल प्रशासनाने गांभीर्याने घ्यावी व ते फलक काढावे अशी मागणीचे निवेदन भाजपातर्फे जिल्हाधिकारी मनीषा खत्री यांना निवेदन देण्यात आले आहे. यावेळी महामंत्री विजय चौधरी, प्रदेश उपाध्यक्ष राजेंद्रकुमार गावित, सरचिटणीस नीलेश माळी अजय कासार, मंदार चौधरी आदि उपस्थित होते.









