नंदुरबार | प्रतिनिधी
नवापूर तालुक्यातील विसरवाडी येथील गोडावुन फोडुन ३६ हजार १०० रूपयांचा माल अज्ञात चोरट्यांनी लंपास केला होते.याप्रकरणी विसरवाडी पोलीसांनी कारवाई करीत तिघांना अटक केली आहे.
याबाबत पोलीस सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, दि . २६ सप्टेंबर रोजी विसरवाडी येथील व्यापारी रविंद्र किसनलाल अग्रवाल यांच्या मालकीचे कुंभार गल्लीतील बालाजी हार्डवेअर दुकानाच्या बाजुला असलेल्या किराणा सामान ठेवायच्या गोडावुन मधुन कुणीतरी अज्ञात चोरट्यांनी गोडावुनचे मागील दरवाजा तोडुन आत घुसुन ३६ हजार १०० रुपयांचा किराणा माल व ईतर वस्तु चोरुन नेल्या . त्याबाबात फिर्यादी यांनी विसरवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला होता. सदर गुन्ह्याचा Aसहाय्यक पोलीस निरीक्षक नितीन पाटील ,पोलीस उपनिरीक्षक भुषण बैसाणे तसेच पोलीस स्टेशन अंमलदार हे त्यांचे पथकातील अधिकारी कर्मचारी यांचे मदतीने तपास करीत असतांना A Aसहाय्यक पोलीस निरीक्षक नितीन पाटील यांना गुप्त बातमीदारांमार्फतीने बातमी मिळाली की , या गुन्ह्याबाबत विसरवाडी गावातील कुंभारगल्ली व नवीदिल्ली भागातील सराईत गुन्हेगारांनी गुन्हा केल्याबाबत माहीती मिळाल्याने पथकातील पोलीस उपनिरीक्षक भुषण बैसाणे , सहाय्यक Aपोलीस उपनिरीक्षक दिलीप गावित , पोहेकॉ राजु कोकणी , पोकॉ विपुल नाईक , विश्वनाथ नाईक , विशाल गाकि यांनी कुंभार गल्ली व नवी दिल्ली विसरवाडी येथे जावुन संशयीत आरोपी सागर रामदास जगदाळे , रा . कुंभार गल्ली , विसरवाडी. गुरुदास झाल्या भिल , राकेश सुरेश साळुखे , दोन्ही रा . नवीदिल्ली , विसरवाडी यांना मोठ्या शिताफिने ताब्यात घेवुन सदर गुन्ह्याबाबात विचारपुस केली असता त्यांनी सदर गुन्हा आम्हीच केला असल्याची कबुली दिली आहे . आरोपीतांना मुद्देमालासह विसरवाडी पोलीसांनी ताब्यात घेतले असुन तपास चालु आहे . सदरची कारवाई पोलीस अधिक्षक पी.आर. पाटील , अपर पोलीस अधिक्षक विजय पवार, उपविभागीय पोलीस अधिकारी नंदुरबार सचिन हिर यांच्या मार्गदर्शनाखाली विसरवाडी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक नितीन पाटील , पोलीस उपनिरीक्षकभुषण बैसाणे व पोलीस अंमलदार यांनी केली आहे .