नंदुरबार l

येथील रोटरी क्लबच्या अध्यक्षपदी ऍड.निलेश देसाई तर सचिवपदी कपिल अग्रवाल यांची निवड करण्यात आली आहे.
सन १९६७ पासून सामाजिक उपक्रमात अग्रेसर असलेल्या रोटरी इंटरनॅशनल या आंतरराष्ट्रीय पातळीवरील सेवाभावी संस्थेच्या अंतर्गत कार्यरत असलेल्या रोटरी क्लब नंदुरबारच्या सन २०२३-२४ या कालावधीसाठी अध्यक्षपदी ऍड.निलेश देसाई तर सचिवपदी कपिल अग्रवाल यांची निवड करण्यात आली असून १ जुलै २०२३ पासून एका वर्षासाठीचा त्यांचा कार्यकाळ सुरु झाला आहे. या वर्षभरात त्यांनी सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक, आरोग्य, कायदे विषयक व पर्यावरण यासारख्या विविध क्षेत्रात कार्य करण्याचा मानस व्यक्त केला आहे.

त्यांच्या सोबत वरील सर्व कामात हातभार लावण्यासाठी त्यांनी नियुक्त केलेल्या समितीत उपाध्यक्षपदी डॉ.राजेंद्र कासार, खजिनदार दीपक शाह, पब्लिक इमेज चेअरपदी प्रा.पंकज पाठक, मेंबरशिप चेअरपदी प्रा.टेनी, सर्विस चेअरपदी डॉ.आर.एस.चौधरी, फाऊंडेशन चेअरपदी हिरालाल महाजन, क्लब ऍडमिनिस्टेटीव्हपदी डॉ.निर्मल गुजराथी तर सार्जण्ट ऍट आर्मपदी आर्कि. उदय शाह यांची निवड करण्यात आली आहे.









