Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

दोन मोटार सायकल चोरट्यांना अटक, तिन लाखाच्या 10 दुचाकी जप्त, 6 गुन्ह्यांची उकल

team by team
July 3, 2023
in क्राईम
0
दोन मोटार सायकल चोरट्यांना अटक, तिन लाखाच्या 10 दुचाकी जप्त, 6 गुन्ह्यांची उकल

 

नंदूरबार l प्रतिनिधी

 

 

दोन मोटार सायकल चोरट्यांना नवापूर पोलीसांनी अटक केली असून 3 लाख रुपये किमंतीच्या 10 दुचाकी जप्त करीत 6 गुन्ह्यांची उकल करण्यात यश आले आहे.

 

 

नंदुरबार जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक पी. आर. पाटील यांनी गुन्हे बैठकीत मोटार सायकल चोरीच्या गुन्ह्यांचा गुन्हे आढावा घेतला असता, नंदुरबार जिल्ह्यातील विविध पोलीस ठाणे हद्दीत मोटर सायकल चोरीचे गुन्हे दाखल आहेत. तसेच पोलीसांसमोर चोरट्यांना जेरबंद करून घडलेले गुन्हे उघडकीस आणणे हे मोठे आव्हान होते.

 

त्या अनुषंगाने मोटर सायकल चोरीच्या गुन्ह्यांचा गांभीर्याने तपास करून मोटर सायकल चोरीचे गुन्ह्यातील सक्रीय गुन्हेगारांवर कारवाई करण्याबाबत पोलीस अधीक्षक पी. आर. पाटील यांनी निर्देश गुन्हे बैठकीत सर्व पोलीस ठाणे प्रभारी अधिकाऱ्यांना दिले.

 

 

वरिष्ठांच्या सुचना व मार्गदर्शनानुसार पोलीस ठाणे प्रभारी अधिकारी नंदुरबार जिल्ह्यातील विविध पोलीस ठाणे अंतर्गत चोरी झालेल्या मोटार सायकल चोरीच्या पध्द्तीचा अभ्यास करुन वारंवार चोरी होणारे ठिकाण, वेळ, दिवस किंवा चोरी होणारी विशेष कंपनीची मोटार सायकल यांची इत्यंभूत माहिती घेवुन रेकॉर्डवरील जेलमधुन सुटुन आलेल्या मोटार सायकल चोरीच्या गुन्ह्यातील गुन्हेगारांवर तसेच ज्या ठिकाणावरुन जास्त प्रमाणात मोटर सायकल चोरीस जातात त्याठिकाणी पाळत ठेवुन होते. तसेच आपले बातमीदारांमार्फत माहिती घेवुन मोटर सायकल चोरांचा शोध घेत होते.

 

 

दि. 24 जुन 2023 रोजी पोलीस अधीक्षक शपी. आर. पाटील यांना गुप्त बातमीदारामार्फत बातमी मिळाली की, नवापूर पोलीस ठाणे हद्दीतील मोटार सायकल ह्या नंदुरबार शहरातील रज्जाक पार्क येथील इसमांनी चोरी केलेल्या असून ते नंदुरबार शहरातील अमृत चौक परिसरात फिरत असल्याची बातमी मिळाल्याने सदरची माहिती त्यांनी नवापूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर वारे यांना सांगितली, नवापूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक

 

 

ज्ञानेश्वर वारे यांनी तात्काळ नवापूर पोलीस ठाण्याचे एक पथक तयार करुन मिळालेल्या बातमीमधील संशयीतांना ताब्यात घेवून पुढील कारवाई करण्याचे आदेश देवून नंदुरबार येथे रवाना केले.

 

नवापूर पोलीस ठाण्याच्या पथकाने नंदुरबार शहरातील अमृत चौक परिसरात जावून मिळालेल्या बातमीमधील संशयीतांचा शोध घेता असता, दोन इसम विना नंबरच्या मोटार सायकलसह फिरतांना दिसून आल्याने माजितखान शाहदतखान कुरेशी रा. रज्जाक पार्क, नंदुरबार,साहिल अन्वर मेहतर वय 18 वर्षे रा. पाथाडी रोड, प्रथम यश विहार रेसिडेन्सी, नंदुरबार यांना ताब्यात घेतले.

 

त्यांच्या ताब्यात मिळून आलेल्या मोटार सायकलचे कागदपत्र विचारले असता ते उडव उडवीची उत्तरे देवू लागले म्हणून त्यास विश्वासात घेवून विचारपूस केली असता, त्यांनी सदरची मोटार सायकल 5 ते 6 दिवसापूर्वी नवापूर शहरातील रेस्टे स्थानक परिसरातील वाहन पार्किंग येथून चोरी केली असल्याचे सांगितले. त्याबाबत नवापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल असल्याचे निष्पन्न झाल्याने सदरचे वाहन कायदेशीर प्रक्रिया करुन जप्त करण्यात आले. संशयीत आरोपीतांना नवापूर पोलीस ठाणे येथे आणून अधिक विश्वासात घेवून विचारपूस केली असता,

 

 

त्यांनी दोघांनी मिळून मागील 5 ते 6 महिन्यात नवापूर शहरातील रेल्वे स्टेशन पार्किंग, जनता पार्क व इतर ठिकाणाहून मोटार सायकल चोरी करून नागरिकांना पैशांची अडचण असल्याचे सांगून चोरी केलेल्या मोटार सायकली ताबे गहाण ठेवले असल्याबाबत सविस्तर माहिती सांगितली. नवापूर पोलीस ठाण्याच्या पथकाने नागरिकांकडे ताबे गहाण ठेवलेल्या आणखी 9 मोटार सायकल हस्तगत करुन त्याबाबत नवापूर व जिल्ह्यातील इतर पोलीस ठाण्यांचा गुन्हे अभिलेखाची पडताळणी केली असता नवापूर पोलीस ठाण्यात 5 गुन्हे दाखल असल्याचे निष्पन्न झाले

 

ताब्यात घेण्यात आलेल्या दोन्ही संशयित आरोपीतांकडून तीन लाख रुपये किमतीच्या चोरी केलेल्या एकुण 10 मोटार सायकली हस्तगत करून नंदुरबार जिल्ह्यातील 6 मोटार सायकल चोरीचे गुन्हे उघड आणण्यात नवापूर पोलीसांना यश आले आहे. तसेच इतर चार मोटार सायकलींबाबत मुळ मालकांचा शोध घेवून त्याबाबत गुन्हे दाखल आहेत अगर कसे ? याबाबत माहिती घेण्यात येत आहे.

 

 

सदरची कामगिरी पोलीस अधीक्षक पी. आर. पाटील, अपर पोलीस अधिक्षक निलेश तांबे, नंदुरबार विभागाचे उप विभागीय पोलीस अधिकारी संजय महाजन यांच्या मार्गदर्शनाखाली नवापूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर वारे, पोलीस उप निरीक्षक मनोज पाटील, अशोक मोकळ, पोलीस हवालदार दादाभाऊ वाघ, दिनेशकुमार वसुले पोलीस नाईक कैलास तावडे, पोलीस अंमलदार संदीप सोनवणे, पवन काकरवाल, रविंद्र भोई, दिपक पाटील यांच्या पथकाने केली आहे.

बातमी शेअर करा
Previous Post

अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रिपदाची, तर आठ जणांनी घेतली मंत्रिपदाची शपथ

Next Post

तीन हजाराची लाच स्वीकारताना तलाठयाला रंगेहाथ अटक

Next Post
तीन हजाराची लाच स्वीकारताना तलाठयाला रंगेहाथ अटक

तीन हजाराची लाच स्वीकारताना तलाठयाला रंगेहाथ अटक

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

पालिकेतर्फे महिला मेळावा; बचत गटांना धनादेश वितरणासह गुणवंतांचा सन्मान

पालिकेतर्फे महिला मेळावा; बचत गटांना धनादेश वितरणासह गुणवंतांचा सन्मान

March 10, 2026
विधी सेवा महाशिबिरातून नागरिकांच्या जीवनमानात बदल घडविण्याचा प्रयत्न : न्यायमूर्ती किशोर संत

विधी सेवा महाशिबिरातून नागरिकांच्या जीवनमानात बदल घडविण्याचा प्रयत्न : न्यायमूर्ती किशोर संत

March 10, 2026
डॉ. हिना गावित यांच्या हस्ते महिलांना भेट वस्तूंच वितरण

डॉ. हिना गावित यांच्या हस्ते महिलांना भेट वस्तूंच वितरण

March 10, 2026
माजी खा.डॉ. हिना गावित यांनी सिंहस्थ पर्वणी संदर्भात अधिकाऱ्यांकडून घेतला आढावा

माजी खा.डॉ. हिना गावित यांनी सिंहस्थ पर्वणी संदर्भात अधिकाऱ्यांकडून घेतला आढावा

March 10, 2026
भाजपातर्फे छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती साजरी

भाजपातर्फे छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती साजरी

March 7, 2026
डॉ.विक्रांत बाबा मित्र परिवारा मार्फत शिवजयंती उत्साहात साजरी

डॉ.विक्रांत बाबा मित्र परिवारा मार्फत शिवजयंती उत्साहात साजरी

March 7, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add