मुंबई | प्रतिनिधी

महाराष्ट्राच्या राजकारणात मोठा राजकीय भूकंप झाला असून शिवसेनेनंतरआता राष्ट्रवादीत मोठी फुट पडली आहे. राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी विधानसभेच्या विरोधी पक्षनेतेपदाचा राजीनामा देत थेट शिंदे-फडणवीस यांच्या सरकारमध्ये सहभागी होत उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली आहे.
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी खळबळ माजली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार सरकारमध्ये सहभागी झाले आहेत. अजित पवार यांनी शिदे, फडणवीस सरकारला पाठिंबा दिल्याने पहाटेच्या शपथविधीनंतर पुन्हा एकदा धक्का बसला आहे. अजित पवार राजभवनात उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली आहे.
अजित पवार यांच्यासोबत नाशिक जिल्ह्याचे माजी पालकमंत्री तथा येवला मतदारसंघाचे आमदार छगन भुजबळ यांनी कॅबिनेट मंत्री पदाची शपथ घेतली. त्यांमुळे आता नाशिक जिल्ह्याचे सध्याचे पालकमंत्री दादा भुसे यांना कोणत्या जिल्ह्याच्या पालकमंत्री पदाची जबाबदारी मिळते हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.









