Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

नंदूरबार येथे कृषि दिनानिमित्त शेतकऱ्यांचा सत्कार

team by team
July 2, 2023
in राज्य
0
नंदूरबार येथे कृषि दिनानिमित्त शेतकऱ्यांचा सत्कार
नंदूरबार l प्रतिनिधी
दि.१ जुलै रोजी के. वसंतराव नाईक यांच्या जयंतीनिमित्ताने याहा मोगी सभागृह जिल्हा परीषद, नंदूरबार येथे जिल्हा परिषद अध्यक्षा डॉ. सुप्रिया गावित यांच्या अध्यक्षतेखाली कृषि दिनाचे आयोजन करण्यात आले होते.यावेळी जिल्ह्यातील शेतिनिष्ठ शेतकरी पुरस्कार प्राप्त तसेच पिक स्पर्धेमध्ये विजेत्या शेतकऱ्यांचा सत्कार करण्यात आला.
 हरीतक्रांतीचे प्रणेते कै. वसंतराव नाईक यांच्या कृषि विषयक केलेल्या उल्लेखनिय कार्याचा गौरव करून डॉ.सुप्रिया गावित यांनी उपस्थित शेतकऱ्यांना मार्गदर्शन करताना शेतमालाचे मूल्य वृध्दी करून कसा फायदा होतो याबद्दल मार्गदर्शन केले. त्याचबरोबर नंदूरबार जिल्हा निर्मितीच्या रौप्य महोत्सवाच्याही शुभेच्छा उपस्थितांना दिल्या. तसेच जिल्हा परीषद उपाध्यक्ष सुहास नाईक यांनी देखिल शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले.मुख्य कार्यकारी अधिकारी रघुनाथ गावडे यांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून शेती करण्याबद्दल मार्गदर्शन केले.
कृषि दिनाचे औचित्य साधून जिल्ह्यातील शेतिनिष्ठ शेतकरी पुरस्कार प्राप्त तसेच पिक स्पर्धेमध्ये विजेत्या शेतकऱ्यांचा सत्कार जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा डॉ. सुप्रिया गावित, उपाध्यक्ष सुहास नाईक, कृषी सभापती हेमलता शितोळे, शिक्षण सभापती गणेश पराडके, महिला बालकल्याण सभापती संगिताताई गावित,  मुख्य कार्यकारी अधिकारी रघुनाथ गावडे , मुख्य कार्यकारी अधिकारी प्रमोदकुमार पवार यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
कृषि विकास अधिकारी प्रकाश खरमाळे यांनी प्रस्तावना करताना कै. वसंतराव नाईक यांनी कृषि क्षेत्रात केलेल्या कार्याचा तसेच त्यांचा जीवन परीचय करून दिला.
सदर कार्यक्रमास जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी नंदूरबार राकेश वाणी, कृषि उपसंचालक वसंत चौधरी, उपविभागीय कृषि अधिकारी चेतनकुमार ठाकरे, कृषि विकास अधिकारी जिल्हा परीषद नंदूरबार  प्रकाश खरमाळे, जिल्हा कृषि अधिकारी (सा) जिल्हा परीषद नंदूरबार उज्वलसिंग गिरासे, मोहिम अधिकारी जिल्हा परीषद नंदूरबार सचिन देवरे यांचे मार्गदर्शन लाभले. जयंत उत्तरवार विषय विशेषज्ञ कृषि विज्ञान केंद्र कोळदा यांनी उपस्थित शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले. सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कृषी अधिकारी उमेश भदाणे यांनी केले. तसेच सदर कार्यक्रमास विस्तार अधिकारी एम. जी. विसपुते, श्रीमती. टि.एस.पाटील तसेच कृषि विभागातील कर्मचारी यांनी परीश्रम घेतले. कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन कृषि अधिकारी अनिल कागणे यांनी केले.
बातमी शेअर करा
Previous Post

समृद्धी महामार्गावरील अपघातांचा तज्ञांमार्फत अभ्यास करुन उपाययोजनांची प्राधान्याने अंमलबजावणी करणार – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

Next Post

ब्रेकिंग न्यूज : विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी घेतली उपमुख्यमंत्रीपदाची शपथ, छगन भुजबळ यांचाही शपथविधी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

पालिकेतर्फे महिला मेळावा; बचत गटांना धनादेश वितरणासह गुणवंतांचा सन्मान

पालिकेतर्फे महिला मेळावा; बचत गटांना धनादेश वितरणासह गुणवंतांचा सन्मान

March 10, 2026
विधी सेवा महाशिबिरातून नागरिकांच्या जीवनमानात बदल घडविण्याचा प्रयत्न : न्यायमूर्ती किशोर संत

विधी सेवा महाशिबिरातून नागरिकांच्या जीवनमानात बदल घडविण्याचा प्रयत्न : न्यायमूर्ती किशोर संत

March 10, 2026
डॉ. हिना गावित यांच्या हस्ते महिलांना भेट वस्तूंच वितरण

डॉ. हिना गावित यांच्या हस्ते महिलांना भेट वस्तूंच वितरण

March 10, 2026
माजी खा.डॉ. हिना गावित यांनी सिंहस्थ पर्वणी संदर्भात अधिकाऱ्यांकडून घेतला आढावा

माजी खा.डॉ. हिना गावित यांनी सिंहस्थ पर्वणी संदर्भात अधिकाऱ्यांकडून घेतला आढावा

March 10, 2026
भाजपातर्फे छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती साजरी

भाजपातर्फे छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती साजरी

March 7, 2026
डॉ.विक्रांत बाबा मित्र परिवारा मार्फत शिवजयंती उत्साहात साजरी

डॉ.विक्रांत बाबा मित्र परिवारा मार्फत शिवजयंती उत्साहात साजरी

March 7, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add