नंदुरबार l प्रतिनिधी
राज्य निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार नंदुरबार जिल्हा परिषद व पंचायत समिती पोटनिवडणूक 2021 करीता संबंधित निवडणूक विभाग व निर्वाचक गणाच्या क्षेत्रात 5 ऑक्टोंबर 2021 रोजी मतदान होणार आहे.
सदर निवडणूक मुक्त व नि:पक्ष वातावरणात पार पाडणे, निवडणूक कालावधीत कायदा व सुव्यवस्था अबाधित राखणे, निवडणूक प्रक्रियेसाठी आवश्यक समन्वय साधणे, तसेच स्थानिक पातळीवर संबंधित निवडणूक अधिकाऱ्यांना येणाऱ्या समस्यांबाबत मार्गदर्शन करण्यासाठी प्रविण महाजन, अपर जिल्हाधिकारी, जळगाव यांची निवडणूक निरिक्षक म्हणून नियुक्ती करण्यात आली असून त्यांचा भ्रमणध्वनी क्रमांक 9423414215 असा आहे.
निवडणूक निरिक्षक हे नंदुरबार मधील कार्यक्षेत्रात 27 सप्टेंबर, 2021 रोजी उपस्थित राहणार आहे. असे उपजिल्हाधिकारी (महसुल प्रशासन ) तथा नोडल अधिकारी जि.प.व पंचायत समिती पोटनिवडणूक, कल्पना निळ-ठुबे यांनी प्रसिध्दी पत्रकान्वये कळविले आहे.