नंदूरबार l प्रतिनिधी
प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेअंतर्गत माहे एप्रिल 2023 ते जुलै 2023 या कालावधीतील चौदाव्या हप्त्याचा वितरणाची कार्यवाही सध्या सुरू आहे केंद्र शासनाने योजनेच्या चौदाव्या लाभासाठी लाभार्थ्यांनी ई केवायसी व बँक खाते आधार संलग्न करणे बाबी अनिवार्य केल्या आहे.
त्या अनुषंगाने जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी नंदुरबार यांच्या वतीने सदर कॅम्प राबविण्यात आला. यासाठी कृषी विभागाचे कृषि सहाय्यक गावोगावी जाऊन शेतकऱ्यांमध्ये जनजागृती करीत आहेत .
नंदुरबार तालुक्यातील कृषी सहायकांच्या वतीने लाभार्थ्यांना प्रत्यक्ष भेट देऊन, फोन द्वारे तसेच सोशल मीडिया द्वारे ई केवायसी करण्याचे आवाहन करण्यात येत आहे प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना ही शेतकऱ्यांना आर्थिक सहाय्य मिळावे या उद्देशासाठी एक महत्त्वपूर्ण योजना आहे. या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना दरवर्षी सहा हजार रुपये मानधन दिले जाते. ही रक्कम समान तीन हप्त्यांमध्ये दर चार महीन्यांनी शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर जमा होत असते. शेतकऱ्यांच्या खात्यावर 13 वा हप्ता ट्रान्सफर करण्यात आलेला आहे.
आता शेतकरी प्रतीक्षा करीत आहेत 14 व्या हप्त्याची. परंतु हा हप्ता मिळवण्यासाठी शासनमार्फत शेतकऱ्यांना ई केवायसी करण्याची अट ठेवण्यात आलेली आहे. ई केवायसी न करणाऱ्या शेतकऱ्यांना यापुढील मिळणार नाही असे कळविण्यात आलेले आहे.
नंदुरबार तालुक्यातील सर्व कृषी सहाय्यक यांच्यावतीने लाभार्थ्यांना विविध मार्गाने ई केवायसी करण्यासाठी जनजागृती केली जात आहे सर्व कृषी सहाय्यक शेवटच्या व्यक्तीपर्यंत पोहोचून ही केवायसी करण्यास सांगत आहेत. नोडल अधिकारी सुरज रामदास व मंडळ कृषि अधिकारी धानोरा सुनिल गांगर्डे यांच्या मार्गदर्शनाखाली ई केवायसी व बँक खाते आधार संलग्न करणे बाबत कॅम्प वेळावद येथे राबविला गेला. लोय येथील कृषि सहाय्यक वर्षा सामुद्रे यांनी वेळावद येथे यादीचे वाचन करून शेतकऱ्यांचे ई केवायसी करून दिले. यावेळी सरपंच श्रीमती हिना रामसिंग वळवी, उपसरपंच प्रशांत मराठे कृषी मित्र, पोलीस पाटील, ग्रामरोजगार सेवक सह शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.








