Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त नंदुरबारला ‘फिट इंडिया फ्रीडम रन’

team by team
October 13, 2021
in सामाजिक
0
स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त  नंदुरबारला ‘फिट इंडिया फ्रीडम रन’

????????????????????????????????????

नंदुरबार l प्रतिनिधी

भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त देशभर विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येत आहे. सदृढ आणि सक्षम भारताच्या निर्मितीसाठी जिल्हा प्रशासन आणि नेहरू युवा केंद्र, नंदुरबार यांच्यातर्फे आज सकाळी  ‘फिट इंडिया फ्रीडम रन 2.0’ चे आयोजन करण्यात आले होते. यात नंदुरबारकरांनी उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदविला.

‘फिट इंडिया फ्रिडम रन’ची सुरूवात जिल्हाधिकारी कार्यालयापासून झाली. सहायक जिल्हाधिकारी मीनल करनवाल, पोलिस अधीक्षक पी.आर.पाटील, जिल्हा क्रीडा अधिकारी सुनंदा पाटील, राष्ट्रीय सेवा योजनेचे नोडल अधिकारी प्रा. डॉ.माधव कदम, नेहरू युवा केंद्राचे युवा अधिकारी अर्श कौशिक, कार्यक्रम अधिकारी डॉ. मनोज शेवाळे, डॉ. ए.आर.भुयार आदी उपस्थित होते.

सहायक जिल्हाधिकारी श्रीमती करनवाल म्हणाल्या की, युवा पिढी सदृढ राहण्याच्यादृष्टीने प्रधानमंत्री  यांनी ‘फिट इंडिया’ उपक्रम हाती घेतला आहे. देशातील युवक देशाचा आधारस्तंभ असून उद्याचा सदृढ भारत निर्माण व्हावा, यासाठी आज तरुणांनी शरीर स्वास्थांचे महत्व ओळखावे. देशभरात साडेसात कोटी युवक आज या अभियानात सहभागी होत आहेत.

पोलीस अधीक्षक श्री. पाटील म्हणाले की, युवापिढीत आरोग्याविषयी जागरूकता वाढावी. प्रत्येकाने सुदृढ आणि तंदुरुस्त राहण्यासाठी हा उपक्रम हाती घेण्यात आला आहे. स्वतःसाठी, देशासाठी फिट राहण्यासाठी धावणे आवश्यक असल्याचेही त्यांनी सांगितले. प्रा. डॉ. कदम यांनी प्रस्ताविकात स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सव साजरा करताना फिट फॉर फ्रीडमची माहिती सांगितली.

जिल्हाधिकारी कार्यालयापासून मान्यवरांच्या हस्ते हिरवी झेंडी दाखवून दौडला सुरुवात झाली. टोकर तलाव मार्गे पुन्हा पोलिस कवायत मैदानावर या दौडचा समारोप झाला. पोलिस अधीक्षक श्री.पाटील यांनी ‘फिट इंडिया’ची उपस्थितांना शपथ दिली.

 

यावेळी मान्यवरांच्या हस्ते  राष्ट्रीय सेवा योजनेत दिल्ली येथे राजपथावर महाराष्ट्राचे नेतृत्व करणाऱ्या कॉन्टिजन्ट कमांडर प्रतिक कदम, नेहरु युवा केन्द्र संघटनात उत्कृष्ट काम केल्याबद्दल गणेश ईशी, राष्ट्र्रीय कलाकृतीत राष्ट्रीय पातळीवर पोहोचलेला आदर्श संगपाळ, तसेच राष्ट्रीय छात्र सेनेत उत्कृष्ट काम केल्याबद्दल पंकज राऊत, भावेश पाटील, राष्ट्रीय सेवा योजनाचे जिल्हा समन्वयक प्रा. डॉ. कदम, कार्यक्रम अधिकारी डॉ.मनोज शेवाळे,लेप्टनन्ट डॉ.व्ही.झेड.चौधरी, कॅप्टन विलास वाघ, राहुल पाटील, अर्श कौशिक यांचा प्रमाणपत्र देवून सत्कार करण्यात आला. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर निवडकच विद्यार्थ्यांना या दौडमध्ये प्रवेश देण्यात आला होता.

बातमी शेअर करा
Previous Post

केलेली विकासकामे हेच विजयाचे भांडवल:गजानन पाटील यांचा दावा

Next Post

पंडित दीनदयाल उपाध्याय पतपेढीतर्फे शिबिरात 32 रक्तदात्यांनी केले रक्तदान

Next Post
पंडित दीनदयाल उपाध्याय पतपेढीतर्फे शिबिरात 32 रक्तदात्यांनी केले रक्तदान

पंडित दीनदयाल उपाध्याय पतपेढीतर्फे शिबिरात 32 रक्तदात्यांनी केले रक्तदान

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

अभय योजनेतून ५० टक्के दंड माफीसाठी जिल्हाधिकाऱ्यांना प्रस्ताव पाठवणार : आ. चंद्रकांत रघुवंशी

आ.चंद्रकांत रघुवंशींचा मागणीची आदिवासी विकासमंत्र्यांनी घेतली दखल

February 22, 2026
प्रधानमंत्री दिव्याशा केंद्रासाठी प्रयत्न करणार: आ.चंद्रकांत रघुवंशी

प्रधानमंत्री दिव्याशा केंद्रासाठी प्रयत्न करणार: आ.चंद्रकांत रघुवंशी

February 22, 2026
अखिल भारतीय अखंड रघुवंशी क्षत्रिय परिषदेचा राष्ट्रीय युवा कार्याध्यक्षपदी ॲड.राम रघुवंशी

अखिल भारतीय अखंड रघुवंशी क्षत्रिय परिषदेचा राष्ट्रीय युवा कार्याध्यक्षपदी ॲड.राम रघुवंशी

February 22, 2026
विद्यार्थ्यांच्या शिवगर्जनेने दुमदुमले द फ्युचर स्टेप स्कूल

विद्यार्थ्यांच्या शिवगर्जनेने दुमदुमले द फ्युचर स्टेप स्कूल

February 22, 2026
तोरणमाळ फेस्टिव्हलमुळे पर्यटन विकासाला नवी दिशा

तोरणमाळ फेस्टिव्हलमुळे पर्यटन विकासाला नवी दिशा

February 22, 2026
शिवसेना युवा सेनेतर्फे श्री. छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त रक्तदान शिबिर

शिवसेना युवा सेनेतर्फे श्री. छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त रक्तदान शिबिर

February 20, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add