नंदुरबार l प्रतिनिधी
कंजरभाट समाज विकास कृती समिती महाराष्ट्र मुख्य सल्लागार मुरचंद हरी भाट पुणे यांच्या नेतृत्वाखाली संपूर्ण महाराष्ट्रात कंजरभाट समाजातर्फे जातीच्या दाखल्या संदर्भात शासनाने घातलेल्या अटी आणि शर्ती यांच्यामुळे
कंजरभाट समाजाच्या प्रत्येक नागरिकाला अडचण निर्माण झालेली आहे. म्हणून नंदुरबार कंजरभाट समाज विकास कृती समितीच्या जिल्हाध्यक्ष मनोज चव्हाण व कंजरभाट समाजातील सर्व तरुण आणि महिला यांच्या वतीने आज निवासी उपजिल्हाधिकारी सुधीर खांदे यांना निवेदन देण्यात आले.
या निवेदनात म्हटले आहे की, राज्य शासनाकडून शासन आपल्या दारी या योजनेच्या माध्यमातून आमच्या समाजाच्या प्रत्येक नागरिकाला जातीचा दाखला 2018 च्या शासन निर्णयाप्रमाणे स्थानिक ग्रह चौकशी करून आम्ही ज्या ठिकाणी राहतो त्या ठिकाणी येऊन शासनाचे प्रतिनिधी चौकशी करून आणि आणि 61 च्या पुराव्याची अट रद्द करून सर्वांना जातीचे दाखले देण्यात यावे शासनाने शासन आपल्या दारी या योजनेद्वारे ही संकल्पना राबवावी
जेणेकरून आम्हा भटके आणि विमुक्त समाजाला खऱ्या अर्थाने न्याय मिळेल. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडवणीस आणि संबंधित विभागाचे भटक्या आणि विमुक्त विकास विभागाचे मंत्री यांनी या संदर्भात समाजाला जातीचे दाखले उपलब्ध करून द्यावे या आशयाचे निवेदन समाजातील नागरिकांनी दिले आहे.
यावेळी भारतीय जनता पार्टी महिला मोर्चाच्या शहराध्यक्ष काजल मच्छले, नरेंद्र गुमाने ,लोकेश अभंगे विशाल इंद्रेकर ,सुशील नेतलेकर, जयेश इंद्रेकर, कमलेश घाशीकर, ज्ञानेश्वर गुमाने ,रितेश गुमाने, चेतन तमायचेकर ,शशी नेतलेकर , निलेश तमायचेकर, गणेश अभंगे, देवदास गागडे, किशोर भाट, सचिन भाट ,रवी बजरंगे ,राजेश मछले , अर्पणा भाट ,जयपाल नेतलेकर आदी उपस्थित होते.








