नंदुरबार l प्रतिनिधी
जिल्ह्यातील ग्रामीण भागात रुग्णांना तात्काळ उपचार मिळावेत यासाठी शिवसेनेतर्फे दोन रुग्णवाहिका देण्यात आल्या. मुंबईत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते रुग्णवाहिकेच्या चाव्या संपर्कप्रमुख तथा माजी आमदार चंद्रकांत रघुवंशी यांना सुपूर्द करण्यात आल्या आहेत. रुग्णवाहिकेमुळे जिल्ह्यातील रुग्णांना फायदा होणार आहे.
मुंबईच्या गिरगाव येथील नेस्को सेंटरमध्ये सोमवारी शिवसेनेच्या ५७ वा वर्धापन दिवस साजरा करण्यात आला. या ठिकाणी आयोजित कार्यक्रमाच्या समारोपप्रसंगी शिवसेनेतर्फे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते २ रुग्णवाहिका संपर्कप्रमुख तथा माजी आमदार चंद्रकांत रघुवंशी यांना सुपूर्द करण्यात आल्या. नवीन रुग्णवाहिका मिळाल्याने नंदुरबार सारख्या आदिवासी दुर्गम जिल्ह्यातील रुग्णांना तात्काळ उपचार मिळणार आहेत.
यावेळी माजी आमदार चंद्रकांत रघुवंशी यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे आभार मानले.प्रसंगी ज्येष्ठ नेते रामदास कदम, पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील,बंदरे व खणीकर्म मंत्री दादाजी भुसे, अन्न व औषध प्रशासन मंत्री संजय राठोड, रोजगार हमी योजना मंत्री संदिपान भुमरे,उद्योग मंत्री उदय सावंत,आरोग्य मंत्री तानाजी सावंत, शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर,राज्य उत्पादन शुल्क मंत्री शंभूराजे देसाई आदी उपस्थित होते.








