नंदुरबार l प्रतिनिधी
नवापूर शहराच्या वेगवेगळ्या भागात सोसायटीतील सदनिकांचे कुलुप तोडून चोरट्यांनी सोन्या चांदीचे दागिने व रोख रक्कम लंपास केल्याची धक्कादायक घटना काल रात्री घडली.नवापूर शहरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
नवापूर शहरातील जनता पार्क, मंगलदास पार्क, मांदा सोसायटी, साई नगरीत आदी परिसरामध्ये बंद घराना टार्गेट करीत एकाच रात्री सात घरफोड्या झाल्या आहेत.काल रात्री सव्वा चार वाजेच्या सुमारास चोरी झाली आहे. तीन चोरटे मोटरसायकलीने आले चोरी करून गेले सदर घटना सीसीटीव्ही कॅमेरेत कैद झाली आहे.
गेल्या अनेक दिवसांपासून नवापूर शहरात घरफोडीचे सत्र थांबले होते.परंतु अचानक रात्री झालेल्या सहा घरफोड्यांनी पोलिसांच्या कार्यप्रणालीवरच प्रश्नचिन्ह निर्माण केले आहे.या घरातून चोरट्याने लाखो रुपयांचे दागिने रोख रक्कम असा सामान लंपास केल्याची घटना घडली आहे.या अनुषंगाने नवापूर पोलीस ठाण्यामध्ये घरमालकांनी तक्रार दिली असून नवापूर पोलीस त्याच्या शोध घेत आहे.घटनास्थळी पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर वारे यांनी भेट देऊन पाहणी केली.
नवापूर शहरात पेट्रोलिंग वाढवण्याची मागणी नागरिकांनी केली आहे. नवापूर शहरात एकाच रात्री सात घरफोड्या भीतीचं वातावरण निर्माण झाला आहे.
ज्या भागात पोलीस अधिकारी व पोलीस कर्मचाऱ्यांचे वास्तव आहे. तेथेच घरफोड्या झाल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. एस बी साळुंके यांच्या घरात पोलीस उपनिरीक्षक यांचे वास्तव असताना खाली चोरट्यांनी घरफोड्या केल्याने चोरट्यांनी पोलीसांना मोठे आव्हान दिले आहे.
जनता पार्क गल्ली सात व सहा मंगलदास पार्क मध्ये चोरीने नागरिक भयभीत झाले आहेत.जनता पार्क गल्ली नंबर सात मधील अरूण बावा वसावे,यांच्या घरातून पाच तोळे सोने व चांदीचे दागिने रोख रक्कम चोरट्यांनी लंपास केली आहे. तर जनता पार्क गल्ली नंबर सहा मधील रसिद खान पठाण यांच्या घरातील 40 हजार रूपयांची रोकड रोख सीसीटीव्ही च्या डीव्हीआर लंपास केला आहे.
याच भागातील एस बी साळुंके,सुभाष पाटील, प्रतिम बांगर,देवका भोई, साईनगरीत वसंत वळवी यांच्या बंद घराचे कुलूप तोडून चोरी करण्याचा प्रयत्न केला आहे. यातून काय चोरीला गेले आहे असून कळू शकेल नाही. यासंदर्भात नवापूर पोलीस तपास करीत आहेत.लवकरच चोरट्यांना जेरबंद करण्यात येईल अशी माहिती नवापूर पोलीस अधिकार्यांनी दिली आहे.यासंदर्भात नवापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
नवापूर पोलीस ठाण्यामध्ये अनेक पोलीस अधिकारी कर्मचाऱ्यांची पदे रिक्त आहेत कमी अधिकारी कर्मचाऱ्यांवर नवापूर पोलीस स्टेशनच्या कारभार चालत असून यामुळे नवापूर शहरात पोलीस यंत्रणा कमी पडत असल्याचे देखील बोलले जात आहे.यासंदर्भात वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी लक्ष देणे गरजेचे आहे.