नंदुरबार l प्रतिनिधी
भाजपा राष्ट्रीय महामंत्री कैलास विजयवर्गीय हे नंदुरबार जिल्हयाच्या लोकसभा प्रवासानिमित्त दोन दिवसाच्या दौऱ्यावर येत आहे.
केंद्रातील मोदी सरकारला 9 वर्षे पुर्ण झाल्यानिमित्ताने मोदी @ 9 अभियान अनुषंगाने हा दौरा असुन कैलास विजयवर्गीय यांचा दौरा निमित्त भाजपा जिल्हा नंदुरबारच्या वतीने भरगच्छ कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. यात प्रामुख्याने लाभार्थी मेळावा, व्यापारी मेळावा, कार्यकर्ता मेळावा, पत्रकार परीषद, विशाल रॅली व सोशल मिडीया प्रभावशाली व्यक्ती मेळावा अश्या विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
नंदुरबार, नवापुर, साक्री, शिरपुर या 4 विधानसभेत वरील नमुद कार्यक्रम करण्यात येणार आहे. यावेळी राज्याचे आदिवासी विकास मंत्री ना.डॉ.विजयकुमार गावित, भाजपा प्रदेश महामंत्री विजय चौधरी, खा.डॉ.हिना गावित, जि.प.अध्यक्षा डॉ.सुप्रिया गावित, आ.जयकुमार रावल, आ.अमरीशभाई पटेल, आ.काशिराम पावरा, आ.राजेश पाडवी, प्रदेश उपाध्यक्ष राजेंद्रकुमार गावित आदी उपस्थीत राहणार आहे.
वरील सर्व कार्यक्रमांना भारतीय जनता पार्टीचे सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते व नागरीक यांनी मोठया संख्येने उपस्थित रहावे अशी विनंती भाजपा जिल्हा संघटन सरचिटणीस निलेश माळी यांनी केली आहे.