नंदुरबार l प्रतिनिधी
तळोदे तालुक्यातील नया माळ येथे बिबट्याच्या हल्ला एका महिलेचे जागेत मृत्यू झाला असून तळोदा तालुक्यातील शीर्वे परिसरातील नया माळ या गावात सरिता वन्या वसावे वय ३३ रात्री घरात झोपलेल्या असताना पहाटेच्या सुमारास कुणाच्या दरवाजा तोडून बिबट्याने महिलेला ५० ते ६० मीटर बाहेर खेचून नेले व डोक्याच्या भागात चावा घेतल्याने सदर महिला गतप्राण झाली आहे.
नरशा वन्या वसावे,खाल्या वसावे पोचल्या वण्या वसावे यांच्या शेताच्या परिसरामध्ये सदर महिलेचे मृत शरीर आढळून आले असून याबाबत सकाळी माहिती मिळतात तळोदा म्हणून विभागाचे कर्मचारी तळोदा येथील सहायक पोलीस निरीक्षक अमितकुमार बागुल यांनी घटनास्थळी भेट देऊन सविस्तर माहिती घेतली.
दरम्यान तळोदा येथील उपजिल्हा रुग्णालयात सदर मृत महिलेचे विच्छेदन करण्यात आले असून बिबट्याच्या हल्ल्यात मृत झालेल्या मानवी संख्येत आणखीन एक वाढ झाली याबाबत अधिक तपास सहायक पोलीस निरीक्षक अविनाश केदार करीत आहेत.
याबाबत नरशा होण्या वसावे नया माळ ता.तळोदा यांनी तळोदा पोलीस स्टेशनला खबर दिली असून याबाबत. सहाय्यक पोलीस निरीक्षक केदार तपास करीत आहेत दरम्यान सदर घटनेमुळे परिसरामध्ये पुन्हा एकदा बिबट्याची दहशत पसरले असून याबाबत वनविभागाने या परिसरात पिंजरा लावण्याची मागणी होत आहे.
दरम्यान याबाबत अक्कलकुवा वनक्षेत्रपाल ललित गवळी व त्यांचे वन कर्मचारी घटनास्थळापासून ते इतरत्र अधिक माहिती गोळा करीत आहेत. घरापासून महिलेचा मृतदेह पन्नास ते साठ मीटर अंतरावर आढळून आला तर झाडापासून शिरदेखील 30 मीटर अंतरावर आढळून आले. याप्रकरणी महिलेच्या पतीने दिलेल्या फिर्यादीवरून तुळजापूर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आलेली आहे.पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक अविनाश केदार करत आहेत.








