नंदुरबार l प्रतिनिधी
नंदूरबार जिल्हा पोलिस दलातील पाच पोलिस अधिकाऱ्यांच्या बदल्या झाल्या असून चार अधिकारी नव्याने येणार आहेत. शुक्रवारी बदल्यांचे आदेश पारित झाले.
यात बदली झालेल्या पोलिस निरीक्षकांमध्ये पोलिस अधीक्षक यांचे वाचक अर्जुन पटले यांची जात पडताळणी कार्यालयात तर एकनाथ पाटील यांची धुळे येथे जात पडताळणी कार्यालयात बदली झाली आहे.सारंगखेडा पोलिस ठाण्याचे निरीक्षक राजेश शिरसाठ यांची ठाणे येथे बदली झाली आहे.
जात पडताळणीचे निरीक्षक नितीन ठाकरे यांची मुंबई येथे बदली झाली आहे. राजेश शिंगटे यांची बुलढाणा येथे बदली झाली आहे. बाळासाहेब भापकर यांची छत्रपती संभाजीनगर ग्रामीण येथे बदली झाली आहे.
नंदुरबारात येणाऱ्या पोलिस निरीक्षकांमध्ये अजय वसावे हे पालघर येथून येणार आहेत. राजेश जगताप हे धुळे येथून येणार आहेत. नीलेश गायकवाड हे नाशिक येथून नंदुरबारात येणार आहेत.लवकरच हे अधिकारी आपल्या बदलीच्या ठिकाणी हजर होणार आहेत.








