नंदूरबार l प्रतिनिधी
नंदूरबार तालुक्यातील जिल्हा परिषद शाळा उमर्दे खुर्दे येथील सर्व विद्यार्थ्यांना साक्षी मेमोरियल फाउंडेशन नंदुरबारतर्फे दप्तर व शालेय साहित्य वाटप करण्यात आले.
याप्रसंगी सरपंच अरविंद ठाकरे, उपसरपंच सागर मराठे, फाउंडेशनच्या अध्यक्षा संगीता दिलीप साळुंखे, नलिनिबाई जगदीश शिंदे, भावनाबाई सुनील साळुंखे खजिनदार राजेंद्र वसंत शिंदे, कल्पणाबाई राजेंद्र साळुंखे, सचिव प्रकाश हिरामण बेंद्रे , केंद्राचे केंद्र प्रमुख अतिराम पवार, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष .जितेन्द्र मराठे,
ग्रामपंचायत सदस्य पंकज साळुंखे, शाळा व्यवस्थापन समिती सदस्य सुनील मराठे उपस्थित होते. प्रास्ताविक मुख्याध्यापक राजेंद्र बागुल यांनी केले.तर आभार सह शिक्षिका मीना पाटील यांनी केले. सूत्रसंचालन शिक्षक निलेश चव्हाण यांनी केले.








