Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

शेतकरी उत्पादक कंपनी सभासदासाठी सारथी संस्थेमार्फत क्षमता बांधणी प्रशिक्षणाचे आयोजन

team by team
June 17, 2023
in राज्य
0
शेतकरी उत्पादक कंपनी सभासदासाठी  सारथी संस्थेमार्फत क्षमता बांधणी प्रशिक्षणाचे आयोजन

नंदुरबार l प्रतिनिधी

 

शेतकरी उत्पादक कंपनी संचालक, सभासद व मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्यासाठी सारथी संस्थेमार्फत लक्षित गटातील (मराठा, कुणबी, कुणबी-मराठा, मराठा- कुणबी) यांच्यासाठी पुणे, नाशिक, औरंगाबाद, अमरावती, वर्धा, नागपुर, दापोली जि.रत्नागिरी येथे पाच दिवसीय निवासी, विनाशुल्क प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात येणार असल्याची माहिती छत्रपती शाहू महाराज संशोधन, प्रशिक्षण व मानव विकास संस्था,पुणे (सारथी ) च्या नाशिक विभागीय कार्यालयांच्या उपव्यवस्थापकीय संचालक  तथा उपजिल्हाधिकारी सीमा अहिरे  यांनी एका प्रसिद्धी पत्रकान्वये दिली आहे.

 

 

या प्रशिक्षणात शेतकरी उत्पादक कंपनी किंवा शेतकरी गट यांनी आदर्श व्यवस्थापन4 कसे करावे. शेतकरी उत्पादक कंपनींना वित्त पुरवठा वैज्ञानिक प्रतिपूर्ती, कंपनीचे वित्तीय नियोजन व व्यवस्थापन विकास आराखडा तयार करणे. कृषी माल निर्यातीमध्ये शेतकरी उत्पादक कंपनींना वाव, संधी व कार्यप्रणाली. शेतकरी उत्पादक कंपनींच्या माध्यमातून सभासदांना शाश्वत निविष्ठा पुरवठा. बाजाराची गतिशीलता समजवुन घेणे.

 

 

 

शेतकरी उत्पादक कंपनीच्या माध्यमातून शेतमालाची ऑनलाइन विक्री व्यवस्था. कृषी मालाचे विपणन, साठवणूक, प्रक्रिया, मूल्यवर्धन, मुल्यसाखळी तयार करणे. शेतकरी उत्पादक कंपनी सभासद विसंवाद, प्रशासन व लेखाकर्म. व्यवसायिक जोखीम व वित्तीय व्यवस्थापन. केंद्र व राज्य पुरस्कृत शेतकरी उत्पादक कंपनीसाठी विविध योजना, शेतकरी उत्पादक कंपनी सक्षम व्हावी, ती शाश्वत चालावी व त्यामध्ये शेतकऱ्यांचा सक्रीय सहभागासाठी सारथी संस्थेमार्फत सन 2023-2024 या आर्थिक वर्षासाठी वरील उद्दीष्ट्यांच्या आधारे योजना कार्यान्वित केलेली आहे. यामध्ये शेतकरी कंपनीशी निगडीत विविध विषयतज्ञाचे मार्गदर्शन, प्रशिक्षण साहित्य, चहा, नाश्ता, भोजन, निवास, क्षेत्रीय भेट व प्रमाणपत्र इत्यादी बाबीचा समावेश आहे.

 

प्रशिक्षणासाठी पात्र व्यक्ती ही मराठा, कुणबी, कुणबी-मराठा मराठा-कुणबी या लक्षित गटातील असावी व शेतकरी उत्पादक कंपनीची सभासद असावी. शेतकरी उत्पादक कंपनी सभासद हा महाराष्ट्राचा रहिवासी असावा. प्रशिक्षणासाठी पात्र लक्षित गटातील व्यक्ती आर्थिक दृष्ट्या मागासवर्गीय (ईडब्यूसी) / नॉन क्रीमिलीयर गटातील असावी. अथवा सदर सभासद शेतक-यांचे मागील 3 वर्षाचे वार्षीक उत्पन्न हे 8 लाखापेक्षा जास्त नसावे. याबाबतसंबंधित तहसीलदार यांचा उत्पन्नाचा दाखला जोडावा. उत्पादक कंपनीची कंपनी कायदा 2023 नुसार Register of Company (RoC) कडे नोंदणी झालेली असावी. कंपनीच्या भागधारकांची संख्या 50 पेक्षा कमी नसावी. शेतकरी हा नाबार्ड किंवा इतर शासकीय योजनेद्वारे प्रशिक्षणासाठी अनुदान प्राप्त शेतकरी उत्पादक कंपनीचा सभासद नसावा.  एका कंपनीतील जास्तीत जास्त पाच व्यक्ती प्रशिक्षणासाठी सहभागी होऊ शकतात.

 

 

प्रशिक्षणासाठी विहित नमुन्यातील ऑनलाइन अर्ज https://sarthi-maharashtragov.in/  व www.mahamcdc.com  या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. शेतकरी उत्पादक कंपनीच्या माध्यमातुन प्रशिक्षणासाठी ऑनलाइन अर्ज आवश्यक त्या कागदपत्रासह सादर करणे बंधनकारक आहे. प्रशिक्षणार्थी निवड ही शेतकरी उत्पादक कंपनीद्वारे प्राप्त अर्जांपैकी मुल्यांकनाद्वारे अधिक गुणांक प्राप्त करणाऱ्या राज्यातील फक्त प्रथम 192 शेतकरी उत्पादक कंपनीच्या लक्षित गटातील संचालक / सभासद / मुख्य कार्यकारी अधिकारी यांना सन 2023-2024 मध्ये प्रशिक्षणासाठी निवड करण्यात येणार आहे. हे प्रशिक्षण  पुणे, नाशिक, औरंगाबाद, अमरावती, वर्धा, नागपुर, दापोली जि.रत्नागिरी येथे देण्यात येईल.

 

प्रशिक्षण पूर्ण केलेल्या शेतकरी उत्पादक कंपनींना पुढील दोन वर्षे निशुल्क मार्गदर्शन महाराष्ट्र सहकार विकास महामंडळ मार्फत करण्यात येणार आहे. त्यामध्ये संबंधितांना व्यवसायिक संधी उपलब्ध करून देणे, प्रकल्प अहवाल तयार करणे, निविष्ठा पुरवठा, मार्केट लिंकेजेस, इक्विटी ग्रॅन्ट, प्रोपोझल, शेतकरी उत्पादक कंपनी निगडीत योजना, बँक व वित्तीय संस्थांकडून निधी उपलब्धता, शेतकरी उत्पादक कंपनीशी निगडीत शासकीय अधिकारी इतर स्टेक होल्डर यांच्या मध्ये समन्वय साधने इत्यादी सेवा पुरविण्यात येणार आहे. अवश्यकता असल्यास या संस्थांना कालानुरूप विविध नाविन्यपूर्ण विषयाचे पुन्हा पुढील आर्थिक वर्षात शेतकरी उत्पादक कंपनीच्या प्रगतीच्या आधारे प्रशिक्षणाची अतिरिक्त सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे. तरी छत्रपती शाहू महाराज संशोधन, प्रशिक्षण व मानव विकास संस्था, पुणे व महाराष्ट्र सहकार विकास महामंडळ, पुणे यांच्या वतीने या योजनेचा अधिकाअधिक लाभ शेतकरी उत्पादक कंपनींनी घ्यावा असे आवाहन छत्रपती शाहू महाराज संशोधन, प्रशिक्षण व मानव विकास संस्था (सारथी ) पुणे व्यवस्थापकीय संचालक अशोक काकडे तसेच सारथीच्या नाशिक विभागीय कार्यालयांच्या उपव्यवस्थापकीय संचालक  तथा उपजिल्हाधिकारी श्रीमती. अहिरे  यांनी केले आहे.

 

 

बातमी शेअर करा
Previous Post

पीएम किसान योजनेच्या लाभासाठी शेतकऱ्यांनी ई-केवायसी करावी

Next Post

शनिमांडळ येथे आज शनिअमावस्येनिमित्त यात्रोत्सवाचे आयोजन

Next Post
शनिमांडळ येथे आज शनिअमावस्येनिमित्त यात्रोत्सवाचे आयोजन

शनिमांडळ येथे आज शनिअमावस्येनिमित्त यात्रोत्सवाचे आयोजन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

शहाद्याच्या सार्थक पाटीलला रोबोटिक्स ऑलिंपियाडमध्ये सुवर्णपदक

शहाद्याच्या सार्थक पाटीलला रोबोटिक्स ऑलिंपियाडमध्ये सुवर्णपदक

January 22, 2026
शाश्वत शेतीसाठी जैविक कीड नियंत्रण काळाची गरज; नंदुरबार कृषी महाविद्यालयात प्रशिक्षण

शाश्वत शेतीसाठी जैविक कीड नियंत्रण काळाची गरज; नंदुरबार कृषी महाविद्यालयात प्रशिक्षण

January 22, 2026
अविश्वास प्रस्तावावर निर्णय घेण्यासाठी, 27 जानेवारीला विशेष ग्रामसभेचे आयोजन

अविश्वास प्रस्तावावर निर्णय घेण्यासाठी, 27 जानेवारीला विशेष ग्रामसभेचे आयोजन

January 22, 2026
सहकार आयुक्त दिपक तावरे यांनी केली, पतसंस्थांच्या संगणकीकरणाच्या कामाची पाहणी

सहकार आयुक्त दिपक तावरे यांनी केली, पतसंस्थांच्या संगणकीकरणाच्या कामाची पाहणी

January 22, 2026
नंदुरबार जिल्हास्तरीय विज्ञान प्रदर्शनाचा दिमाखदार समारोप; विद्यार्थ्यांच्या वैज्ञानिक प्रतिभेचा गौरव

नंदुरबार जिल्हास्तरीय विज्ञान प्रदर्शनाचा दिमाखदार समारोप; विद्यार्थ्यांच्या वैज्ञानिक प्रतिभेचा गौरव

January 22, 2026
हिंदुत्वाचे सैनिक बनून संघटित व्हा आणि हिंदू मतांची वोट बँक स्थापन करा :  कालीचरण महाराज

हिंदुत्वाचे सैनिक बनून संघटित व्हा आणि हिंदू मतांची वोट बँक स्थापन करा : कालीचरण महाराज

January 22, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add