म्हसावद l प्रतिनिधी
तळोदा तालुक्यातील आमलाड येथील विद्यागौरव इंग्लिश मेडियम स्कूल येथे शाळाप्रवेशोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.
अध्यक्षस्थानी प्राचार्य विश्वास पवार हे होते तर प्रमुख पाहुणे म्हणून ललित पाठक हे होते. यावेळी सर्व विद्यार्थ्यांचे वाजत गाजत स्वागत करून औक्षण करण्यात आले शाळेच्या गेटवर सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांनी उभे राहून विद्यार्थ्यांचे पुष्पगुच्छ देऊन तथा फुलांची उधळण करत टाळ्या वाजवून स्वागत करीत कार्यक्रमाचे औपचारिक उद्घाटन करण्यात आले सर्व स्टाफने टाळ्या वाजवून तसेच प्रथम येणाऱ्या 5 विद्यार्थ्यांना पेन भेट म्हणून देण्यात आली त्यानंतर चिमुकल्या बालकांच्या हातून केक कापून आनंद साजरा करण्यात आला व सर्वांना चॉकलेट वाटून तोंड गोड करण्यात आले.व शैक्षणिक सत्र 2023 – 24 ची औपचारिक सुरुवात करण्यात आली.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन किरण वळवी यांनी केले. तसेच कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शिक्षिका प्रीती बुनकर,विजया भारती, गौरी सूर्यवंशी, सारीका शिंदे,वैशाली पावरा,मयुरी पवार,नेहा कासार,आरती मॅडम,श्रावण सूर्यवंशी,संजय मोरे,क्रीडा शिक्षक पुलायन जाधव,दशरथ वसावे व शिक्षकेतर कर्मचारी यांनी प्रयत्न केले.