शहादा l प्रतिनिधी
येथील जायंटस गृप , जायंटस सहेली व हिरकणी सहेली आदिंच्या संयुक्त विद्यमाने आधार कार्डाची (युआयडी)सुरुवात झालेल्या व त्यासाठी भारतभर प्रसिध्द झालेल्या टेंभली येथील जि.प.मराठी शाळेत शाळारंभ दिवस साजरा करण्यात आला.
जायंटस गृप, जायंटस सहेली, हिरकणी सहेली तर्फे मुलांचे गुलाब पुष्प , वही, पेन्सील, बिस्कीट,फळे, चाॅकलेट देवुन स्वागत करण्यात आले.शाळा प्रवेशाच्या प्रसंगी मुलांचा उत्साह अवर्णनीय होता. या प्रसंगी गाणी म्हणुन आनंद व्यक्त केला. अथर्व पाटील या चिमुकल्याचा वाढदिवस या प्रसंगी साजरा करण्यात आला.त्या निमित्ताने जायंटस सहेली अध्यक्षा अरुणा पाटील यांच्या कडुन उपस्थीत मुलांना वह्या व फळे वाटप करण्यात आले.
या प्रसंगी जायंटस स्पेशल कमिटी मेंबर रविंद्र जमादार, जायंटस गृपचे अध्यक्ष प्रा.डाॅ.एच. एम पाटील, सरपंच आझाद ठाकरे,फेडरेशन डायरेक्टर माणक चौधरी, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष कैलास निगुडे, जा. सहेली अध्यक्षा अरुणाताई पाटील, जायंटस हिरकणी अध्यक्षा मनिषा पाटील, जायंटस सचिव अजबसिंग गिरासे, हिरकणी उपाध्यक्षा विजया मोरे, सदस्या सुकन्या पाटील, मंगल पाटील, तसेच प्रा डाॅ रविंद्र पाटील उपस्थित होते.कार्यक्रमाचे संयोजन शाळेतील शिक्षक वृंद विवेक विसपुते,नाना कोळी,सीमा जगताप, मनिषा पवार यांनी केले.
कार्यक्रमाचे सुत्रसंचालन विलास भोई,प्रास्ताविक जायंटस फेडरेशन अध्यक्षा ॲड संगिता पाटील यांनी केले. आभार मुख्याध्यापिका मीना नारायण पाटील यांनी मानले