नंदूरबार l प्रतिनिधी
अनुदानित प्राथमिक व माध्यमिक आश्रमशाळा जळखे ता.जि. नंदुरबार येथे “विद्यार्थी प्रवेशोत्सव” कार्यक्रम उत्साहात साजरा करण्यात आला.
प्रमुख अतिथी म्हणून डॉ. हेडगेवार सेवा समितीचे विश्वस्त सुखदेव माळी व धनराज कातोरे तसेच प्रशासकीय अधिकारी उमेशजी शिंदे एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प नंदुरबार येथील वरिष्ठ विकास निरीक्षक यु.एल. बेडसे हे उपस्थित होते. कार्यक्रमाच्या सुरुवातीला गावात प्रवेश दिंडी काढण्यात आली, नवप्रवेशित विद्यार्थ्यांचे स्वागत गुलाबपुष्प देवून करण्यात आले. तसेच उपस्थित विद्यार्थीना गावातील सरपंच सौ देखमुताई किशोर गावित व दिनेश वसावे, अनेश वळवी यांच्या हस्ते पुस्तके वह्या वाटप करण्यात आले.
श्री प्रमोद सूर्यवंशी (प्राथ. मुख्या.)यांनी प्रवेशउत्सव साजरा करण्यामागची भूमिका विशद केली. माध्यमिक मुख्याध्यापक प्रवीणकुमार सोनवणे यांनी विद्यार्थी व पालकांना मार्गदर्शन केले. सर्व विद्यार्थी व पालक यांच्यासाठी भोजनाची व्यवस्था करण्यात आली होती. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री रमेश चुनीलाल शिंदे यांनी तर आभार प्रदर्शन अशोक पाटील यांनी केले.