नंदूरबार l प्रतिनिधी
नंदुरबार जिल्ह्यात उत्तम दर्जेदार शिक्षणाच्या सेवेसाठी एम.के.डी. एज्युकेशन सोसायटी नंदुरबार येथे दाखल झाली आहे. नंदुरबार शहरालगत नवापूर रस्त्यावरती शिवन फाटा जवळ भव्य एज्युकेशन कॅम्पस उभारण्यात आले आहे. 14 जून रोजी एम.के.डी. इंग्लिश मीडियम (CBSE) शाळेचा शुभारंभ पहिला दिवस मान्यवर व विद्यार्थी पालक यांच्या उपस्थितीत मोठ्या उत्साहात संपन्न झाला.
यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून सौ. मीना किशोर दराडे एज्युकेशन सोसायटी नंदुरबारचे डायरेक्टर शुभम दराडे, प्रसिद्ध इंजिनीयर व बांधकाम व्यवसायिक कुणाल फटकाळ, एस.एस. एम. व्ही .बाभूळगाव ज्युनिअर कॉलेज प्राचार्य गोरख येवले, सेमी इंग्लिश स्कूल बाभूळगावचे प्राचार्य आप्पासाहेब कदम, एस.एन.डी. इंग्लिश मीडियम स्कूल येवलाचे प्राचार्य श्री. शिंदे, एम. के. डी. पॉलिटेक्निकल कॉलेजचे नंदुरबार प्राचार्य श्री. सचिन सर, श्री.हिरे , एम के डी नंदुरबार जूनियर कॉलेज प्राचार्य श्री. बागुल, एम के डी इंग्लिश मीडियम CBSE स्कूलचे मुख्याध्यापक मनिराज सर आदी मान्यवर प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.

एम के डी इंग्लिश मीडियम स्कूल (CBSE) शाळेच्या पहिल्या दिवशी शिक्षकांनी विद्यार्थ्यांचे औंक्षण करत पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. यानंतर संस्थेचे डायरेक्टर शुभम दराडे यांच्या हस्ते सरस्वती लक्ष्मीपूजन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. यावेळी बोलताना ते म्हणाले की, नंदुरबार हा जिल्हा प्रगत जिल्हा असून देखील या जिल्ह्यातील विद्यार्थ्यांना पुणे, मुंबई, नाशिक यासारख्या मोठ्या शहरात शिक्षणासाठी जावे लागते, त्यांच्या खर्चात बचत व्हावी व त्यांना जिल्ह्यातच चांगले शिक्षण मिळावे यासाठी एम के डी एज्युकेशन सोसायटी दाखल झाली आहे. नर्सरी पासून ते पदवी व पदवी उतर पर्यंतचे शिक्षण एकाच कॅम्पस मध्ये उपलब्ध केले असून याचा विद्यार्थ्यांना नक्कीच फायदा होईल असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.
यानंतर उपस्थित इतर मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त करत एम के डी इंग्लिश मीडियम CBSE स्कूलला भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
यानंतर विद्यार्थ्यांनी श्री गणेशा गाण्यावर नृत्य सादर करून शाळेचा पहिला दिवस दणक्यात सुरू केला. यानंतर विद्यार्थ्यांच्या हस्ते वर्गांचे फीत कापून उद्घाटन करण्यात आले. या शाळेचे सर्व वर्ग अत्याधुनिक व डिजिटल शिक्षण पद्धतीने सज्ज करण्यात आले असून याबाबत शिक्षकांनी पालक व विद्यार्थ्यांना अधिक माहिती दिली.
एकूणच एम. के. डी. एज्युकेशन सोसायटी नंदुरबार कॅम्पस मध्ये शाळेचा शुभारंभ करून पहिला दिवस पालक विद्यार्थी व शिक्षक कर्मचारी यांच्या उपस्थितीत आनंदात साजरा करण्यात आला. एम. के. डी. एज्युकेशन कॅम्पस मध्ये इंग्लिश मीडियम (CBSE) स्कूल सह, अकरावी बारावी आर्ट्स कॉमर्स सायन्स ज्युनिअर कॉलेज, फार्मसी कॉलेज, नर्सिंग कॉलेज इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी कॉलेज सुविधा उपलब्ध आहे. तरी नंदुरबार जिल्ह्यातील विद्यार्थ्यांनी एज्युकेशन कॅम्पस मध्ये भेट देऊन शिक्षण सेवेचा फायदा घ्यावा असे यावेळी मान्यवरांच्या वतीने आवाहन करण्यात आले.
या कार्यक्रमाच्या सफल स्फूर्तीसाठी एम के डी इंग्लिश मीडियम स्कूल (CBSE) शाळेच्या शिक्षिका योगिता तांबोळी, मनीषा आंधळे, चरिता पाटील, पल्लवी गवांदे, जीत धनवार, निलेश गावित, विनोद भालेराव, तसेच ज्युनिअर कॉलेजचे प्राचार्य श्री. बागुल, भाग्यश्री बच्छाव, भारती मंडलिक, वैशाली वळवी, योगेश सोनार, सागर खारकर, जितेंद्र गावित कल्पेश पाटील, स्वप्नील पाटील, आदी शिक्षक व कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.








