नवापूर l प्रतिनिधी
नवापूर येथील सार्वजनिक मराठी प्राथमिक शाळेत शाळेचा प्रथम दिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.
सार्वजनिक मराठी प्राथमिक शाळा डुबास बिल्डिंग नवापूर येथे विद्यार्थ्यांचा शाळेचा पहिला दिवस असल्याने विद्यार्थ्यांसाठी शाळा पूर्व तयारीचे आयोजन करण्यात आले . याप्रसंगी कार्यक्रमांस अध्यक्ष म्हणून लाभलेले संस्थेचे उपाध्यक्ष शिरीषभाई शहा, प्रमुख पाहुणे नेमीचंद् अग्रवाल, शाळेचे मुख्याध्यापक महेश पाटील, व्यासपीठावर उपस्थित होते. गणरायाचे व मा सरस्वती पूजन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.
विद्यार्थ्यांचे गुलाब पुष्प, देऊन स्वागत केले व विद्यार्थ्याना मान्यवरांच्या हस्ते मोफत पाठ्यपुस्तके व खाऊ वाटप करण्यात आला. अध्यक्षीय मनोगतात शिरीष शहा यांनी विद्यार्थी व शिक्षकांना नवीन शैक्षणिक वर्षाच्या शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमाचे प्रास्ताविक शाळेचे मुख्याध्यापक महेश पाटील यांनी केले. व सूत्रसंचालन उपशिक्षिका श्रीमती योगिता पाटील यांनी तर आभार श्रीमती मनीषा भदाणे यांनी मानले. यावेळी श्रीमती माधुरी चित्ते, श्रीमती मीना तांबोळी, श्रीमती करुणा पाटील, श्रीमती हेमलता पाटील, श्रीमती रेसा मावची पालक , विद्यार्थी उपस्थित होते.








