नवापूर l प्रतिनिधी
तालुक्यात मातोश्री बहुउद्देशीय संस्था लहान शहादा बोरपाडा ता नवापूर यांच्यावतीने विविध उद्घाटन व भूमिपूजन माजी जलसंपदा मंत्री महाराष्ट्र राज्य जयंत पाटील यांच्या हस्ते संपन्न झाला.
नंदुरबार जिल्हाच्या नवापूर तालुक्यातील बोरपाडा येथे वृद्धाश्रम व महिला आश्रमचे उदघाटन फित कापून माजी जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांच्या हस्ते करण्यात आले.त्यानंतर डोकारे येथे महिला कारखाना जागेचे भुमिपुजन श्रीफळ फोडुन करण्यात आले.त्य नवापूर शहरातील लीलावती मॉल येथे आदिवासी अर्बन निधी लिमिटेड बँकेचे उद्घाटन करण्यात आले.त नवापूर कृषी उत्पन्न बाजार समिती मैदान येथे १ हजार महिलांना साडी वाटप माजी जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी राष्ट्रवादी कॉग्रेस पक्षाचे माजी आमदार उदेसिंग पाडवी,राष्ट्रवादी जिल्हा उपाध्यक्ष अमृत लोहार,राष्ट्रवादी तालुका अध्यक्ष विनायक गावीत,कृषि उत्पन्न बाजार समिती उपसभापती तळोदा हितेंद्र क्षञिय, शहादा विधानसभा अध्यक्ष कुणाल पाडवी,तळोदा शहराध्यक्ष योगेश मराठे, युवक प्रदेश कार्यकारणी सदस्य राऊ मोरे,राष्ट्रवादी युवक तालुका अध्यक्ष आकाश गावीत,माजी राष्ट्रवादी युवक तालुका अध्यक्ष मनोज वळवी,राष्ट्रवादी अल्पसंख्याक तालुका अध्यक्ष इंद्रीस टिनवाला,कृषि उत्पन्न बाजार समिती संचालक सुनिल वसावे,शहरअध्यक्ष शरद पाटील,जिल्हा उपाध्यक्ष सनी सावरे,कान्हा आतारकर,हेमंत नगराळे ,संदिप परदेशी, बहुउद्देशीय संस्था लहान शहादा बोरपाडा ता नवापूर संस्थेचा अध्यक्ष दिपांजली गावित, उपाध्यक्ष शिवयज॒ गोड,सचिव रामयज्ञा गौड, कार्याध्यक्ष सुरेश गिरी , दिवाणजी गावित,शीला गावित आदी उपस्थित होते.यावेळी माजी जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांच्या सत्कार दिपांजली गावीत व त्यांच्या सहकारीनी केला.

यावेळी जयंत पाटील म्हणाले की, बहुउद्देशीय संस्था लहान शहादा बोरपाडा ता.नवापूर संस्थेचा अध्यक्ष दिपांजली गावित हे नवापूर तालुक्यात फार चांगले काम करीत आहे.डोकारे येथे कंपनीच्या जागेच्या भुमिपुजन झाले त्या कंपनीला सहकार्य करु.ही कंपनी बनल्या नंतर असंख्य महिलांना रोजगार दिपांजली गावीत यांच्या सहकार्याने मिळणार आहे.तसेच बोरपाडा येथील महिला वृध्द आश्रमाची गरज भासल्यास दिपांजली गावीत यांच्याशी संपर्क साधावा.यानंतर माजी आमदार उदेसिंग पाडवी,राष्ट्रवादी कॉग्रेस पक्षाचे जिल्हा उपाध्यक्ष अमृत लोहार,कृषि उत्पन्न बाजार समिती संचालक सुनिल वसावे यांनी पण आपल्या मनोगतातुन संस्थेचे कोतुक करुन अध्यक्ष, सदस्य यांचे अभिनंदन केले.
या कार्यक्रमाची प्रस्तावना व सुञसंचलन दिपांजली गावीत यांनी केले.हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मातोश्री बहुउद्देशीय संस्था लहान शहादा बोरपाडा ता नवापूर पदधिकारी यांनी परीश्रम घेतले.यावेळी कोणताही अनुचित प्रकार होऊ नये म्हणून पोलिस निरीक्षक ज्ञानेश्वर वारे यांच्या मार्गदर्शनाखी उपनिरीक्षक मनोज पाटील,अ.स.इ युवराज परदेशी,विनोद पराडके आदीनी चोख बदोबस ठेवला होता.