Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

जि. प.च्या सर्वसाधारण सभेत कामांच्या बिलावरून गदारोळ, अंगणवाडी सेविकांच्या हाती असणार स्मार्ट वॉच

team by team
June 10, 2023
in राजकीय
0
जि. प.च्या सर्वसाधारण सभेत कामांच्या बिलावरून गदारोळ, अंगणवाडी सेविकांच्या हाती असणार स्मार्ट वॉच
नंदुरबार  l प्रतिनिधी

नंदूरबार जिल्हा परिषदेत झालेल्या कामांचे बिल अदा होत नसल्याच्या कारणावरून सर्वसाधारण सभेत खडाजंगी झाली.अखेर जिल्हा परिषद अध्यक्षा डॉ.सुप्रिया गावीत यांनी याबाबत चौकशी करून दोन दिवसात निर्णय घेण्याचे आदेश दिले.या बैठकीत जिल्ह्यातील विविध विकास कामांना मंजुरी देण्यात आली.

नंदूरबार जि.प.सर्व साधारण सभा याहामोगी सभागृहात जि.प.अध्यक्षा डॉ.सुप्रिया गावित यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली. यावेळी उपाध्यक्ष सुहास नाईक,सभापती गणेश पराडके,संगीता गावीत, शंकर पाडवी, हेमलता शितोळे,अतिरीक्त मुख्य कार्यकारी अधिकारी प्रमोदकुमार पवार, उपमुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र पाटील यांच्यासह सदस्य व जि.प. विविध विभागांचे अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.
यावेळी सर्वसाधारण सभेत माजी.उपाध्यक्ष ॲड.राम रघुवंशी,रतन पाडवी,सी.के.ठाकरे, देवमन पवार यांच्या सह विरोधी पक्षातील सदस्यांनी बांधकाम अधिकाऱ्यांना चांगलेच धारेवर धरले.गेल्या अनेक दिवसांपासून कामे होऊन देखील बिले अदा होत नसल्याचे सांगितले.यावेळी जि. प. सदस्य आक्रमक होत.अडवणुकीचे धोरण असल्याचे सांगितले.यावेळी डॉ.सुप्रिया गावीत यांनी या कामांबाबत तक्रार आल्याने बिले थांबविण्यात आल्याचे सांगितले.तर ॲड राम रघुवंशी यांनी धनादेश तयार झाल्यावर तक्रार घेतात का असा सवाल करीत .एक तरी तक्रार दाखवा असे आव्हान केले.दरम्यान या कामांची दोन दिवसात चौकशी करून बिले देण्याचे डॉ.सुप्रिया गावीत यांनी आश्वासन दिले.दरम्यान रतन पाडवी यांनी सार्वजनिक विभाग व जिल्हा परिषदेच्या सार्वजनिक विभागाच्या विविध कामे १० वर्षापासून सुरू असून अद्याप कामे पूर्ण झाली नसल्याचे सांगत चौकशी करण्याची मागणी केली.
दरम्यान विरोधी पक्षनेते रतन पाडवी यांनी जिल्ह्यात शववाहिणी ची दुरवस्था झाल्याचे सांगत यावर उपायोजना करण्याची मागणी केले.यावर भरत गावीत यांनी याला दुजोरा दिला.जिल्हा परिषद उपाध्यक्ष सुहास नाईक यांनी जिल्हा परिषदेमार्फत शववाहिनी सुरू करण्याचे आश्वासन दिले.तसेच
जिल्ह्यात माता मृत्यू व बालमृत्यू राज्यात सर्वाधिक आहे.हा जिल्ह्याला लागलेला कलंक आहे असे सांगत याबाबत सदस्यांनी प्रश्न उपस्थित करीत यावर उपाययोजना करण्याची मागणी केले.यावेळी डॉ.गावीत यांनी चौकशी करण्याचे आदेश दिले.भरत गावीत यांनी समाज कल्याण विभागातर्फे दोन वर्ष पासून अनुदान देण्यात आले नाही असे सांगत अनुदान देण्याची मागणी केली. भरत गावीत यांच्या सूचनेनुसार जिल्ह्यातील ग्रामपंचायतीच्या स्मशानभूमीत  १ ते १५ ऑगस्ट दरम्यान झाडे लावण्यात येणार आहे.
दरम्यान सर्वसाधारण सभेत नंदूरबार तालुक्यातील वाघाळे, भादवड, नवापूर तालुक्यातील मोग्रानी, शहादा तालुक्यातील प्रकाशा, कोठली येथे आदिवासी वस्तीत सांस्कृतिक भवन बांधकामास मंजुरी देण्यात आली.अक्कलकुवा तालुक्यातील कुवा येथे आरोग्य विभागाचे उपकेंद्र इमारत बांधकामास मंजुरी देण्यात आली.यासह विविध कामना मंजुरी देण्यात आली.
अंगणवाडी सेविकांच्या हाती असणार स्मार्ट वॉच
नंदूरबार जिल्हा परिषदेच्या वार्षिक आदिवासी उपयोजना अंतर्गत प्राथमिक आरोग्य केंद्राचे बळकटीकरण अंतर्गत आशा किट खरेदी साठी दोन कोटी १० लाख ७४ हजार ९०४ रुपयांच्या निधीची मंजुरी देण्यात आली.त्यामुळे आता.अंगणवाडी सेविकांच्या हाती असणार स्मार्ट वॉच असणार आहे.
बातमी शेअर करा
Previous Post

ऑनलाईन नोंदणी करून कामगारांनी विविध योजनांचा लाभ घ्यावा : पालकमंत्री डॉ. विजयकुमार गावित

Next Post

मोठ्ठी बातमी : मुंबई येथील भरारी पथकावर दारू तस्करांचा हल्ला,दहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल

Next Post
मोठ्ठी बातमी : मुंबई येथील भरारी पथकावर दारू तस्करांचा हल्ला,दहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल

मोठ्ठी बातमी : मुंबई येथील भरारी पथकावर दारू तस्करांचा हल्ला,दहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

पालिकेतर्फे महिला मेळावा; बचत गटांना धनादेश वितरणासह गुणवंतांचा सन्मान

पालिकेतर्फे महिला मेळावा; बचत गटांना धनादेश वितरणासह गुणवंतांचा सन्मान

March 10, 2026
विधी सेवा महाशिबिरातून नागरिकांच्या जीवनमानात बदल घडविण्याचा प्रयत्न : न्यायमूर्ती किशोर संत

विधी सेवा महाशिबिरातून नागरिकांच्या जीवनमानात बदल घडविण्याचा प्रयत्न : न्यायमूर्ती किशोर संत

March 10, 2026
डॉ. हिना गावित यांच्या हस्ते महिलांना भेट वस्तूंच वितरण

डॉ. हिना गावित यांच्या हस्ते महिलांना भेट वस्तूंच वितरण

March 10, 2026
माजी खा.डॉ. हिना गावित यांनी सिंहस्थ पर्वणी संदर्भात अधिकाऱ्यांकडून घेतला आढावा

माजी खा.डॉ. हिना गावित यांनी सिंहस्थ पर्वणी संदर्भात अधिकाऱ्यांकडून घेतला आढावा

March 10, 2026
भाजपातर्फे छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती साजरी

भाजपातर्फे छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती साजरी

March 7, 2026
डॉ.विक्रांत बाबा मित्र परिवारा मार्फत शिवजयंती उत्साहात साजरी

डॉ.विक्रांत बाबा मित्र परिवारा मार्फत शिवजयंती उत्साहात साजरी

March 7, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add