नंदुरबार l प्रतिनिधी
प्रत्येकाची अनेक स्वप्न असतात पण हो स्वप्न सत्यात उतरवण्यासाठी त्या स्वप्नांना महेनतीची जोड लागते याच महेनतीच्या जेरावर धुळे येथील आसीम खान किफायत खान या तरुणाने यूपीएससीच्या परीक्षेत यश मिळवले आहे आसीम खान यांनी केंद्रीय लोक सेवा आयोगामार्फत घेण्यात आलेल्या परीक्षेत देशात 558 वा क्रमांक पटकावला आहे सर्वात महत्वपूर्ण बाब म्हणजे आसीम खान यांचे संपुर्ण शिक्षण हे ऊर्दू माध्यमातुन झाले आहे तसेच त्यांनी यूपीएससीची परीक्षा सुध्दा ऊर्दू माध्यमातुनच दिली आहे
भारतातून ऊर्दू माध्यमातुन परीक्षा पास करणारे यावर्षी आसीम खान एकमेव उमेदवार आहेत. यापुर्वी ते मुलाखतीसाठी पात्र ठरले होते, पण अंतिम सिलेक्शन झाले नव्हते मात्र यावर्षी आसीम खान यांनी अंतीम यादीत स्थान मिळवले.
ऊर्दू माध्यमाच्या विद्यार्थ्यांनी भाषेचा न्युनगंडन बाळगता जिद्दीने अभ्यास केला तर भाषा हा अडथळा ठरत नाही हेच यातुन सिध्द होते .आसीम खान यांच्या निवडीमुळे खानदेशातील तरुणांना नक्कीच प्रेरणा मिळेल.
आसीम खान यांचे वडील किफायत खान यासीन खान हे धुळे नगर पालिकेत शिक्षक होते. पण ते सध्या सेवा निवृत्त झाले. आई ही धुळे नगर पालिकेत शिक्षिका होती १७ महिन्यापूर्वी आई रईसा बी यांचे निधन झाले आहे. आसीम खान यांचे मोठे भाऊ अब्दुल कय्युम खान हे शहादा नगर पालिकेत सध्या उर्दू माध्यमाचे शिक्षक आहे त्यांना दोन बहिणी असुन मोठी बहीण शगुफ्ता खान नंदुरबार नगर परिषद ऊर्दू शाळेत शिक्षिका आहे.
तर दुसरी बहीण मुबशशेरा खान ही धुळे जिल्ह्यातील पिंपळनेर जिल्हा परिषद शाळेत ऊर्दू शिक्षिका आहे. धुळे जिल्ह्यातील या तरुणाने हे यश मिळविल्याने त्याचे सर्वत्र कौतुक करण्यात येत आहे.