नंदूरबार l प्रतिनिधी
नंदुरबार येथील कृषी अधीक्षक कार्यालय समोर उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेतर्फे एक दिवशी धरणे आंदोलन करण्यात आले.
तालुका कृषी अधिकारी कार्यालय समोर जिल्ह्यातील बोगस बियाणे व बोगस खाते विक्री होत असल्याने उद्धव शिवसेनेतर्फे तीव्र आंदोलन छेडण्यात आले.
आंदोलनामध्ये शिवसेनेचे महानगर प्रमुख पंडित माळी, के.डी.गावीत, तालुका प्रमुख विजय गावीत, छोटू चौधरी, महिला आघाडी प्रमुख रिना पाडवी, मालती वळवी, लक्ष्मी गावित, गुलाब पाटील, विशाल चौधरी, विनोद पाटील व माजी सैनिक पाटील या आंदोलनात सहभागी झाले होते सकाळी अकरा वाजता आंदोलन करण्यात आले व कृषी विभागातील अधिकाऱ्यांना आंदोलनाच्या ठिकाणी बोगस बियाणे बोगस खते यांच्यावर आपण काय कारवाई करणार आहात याबद्दल विचारणा करण्यात आले. यावेळी कृषी विभागाचे कृषी उपसंचालक वसंत चौधरी, तालुका कृषी अधिकारी स्वप्निल शेळके, कृषी अधिकारी विजय मोहिते, पंचायत समिती कृषी अधिकारी योगेश हिवराळे यांनी आंदोलकांना बोगस बियाणे विक्री करणाऱ्या दुकान धारकांवर कारवाई करण्याचे आश्वासन दिले व जिल्ह्यात सर्वत्र पथके नेमून बोगस बियाणे व खते साठा जप्ती करण्याची आश्वासन देण्यात आले.
तसेच आंदोलकांनी पंधरा दिवसाच्या आत सर्व गोष्टी तपासून योग्य कार्य करून शेतकऱ्यांची फसवणुकीपासून न्याय मिळेल अशी कारवाई करावी यासाठी आंदोलकांनी आंदोलन दुपारी चार वाजता स्थगित केले व कृषी विभागातील अधिकाऱ्यांकडून लेखी स्वरूपात पत्र घेऊन आंदोलन मागे घेण्यात आले व महानगर प्रमुख यांनी पुढील काळात योग्य कारवाई न झाल्यास राष्ट्रीय महामार्गावर तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असेही सूचित केले.