नंदुरबार l प्रतिनिधी
नंदुरबार तालुक्यातील शनिमांडळसह परिसरात डास व मच्छरांचा प्रार्दुभाव तसेच डेग्यू व मलेरियाची साथ सुरु असून त्या पार्श्वभूमीवर गावात सामाजिक कार्यकर्त्याकडून स्वखर्चातुन धुरळ फवारणी करण्यात आली आहे.
नंदुरबार तालुक्यातील पूर्व पट्टयातील शनिमांडळ, तिलाली, तलवाडे गावात गेल्या काही दिवसांपासून साथीचे आजाराचे प्रमाण वाढले असून त्या पार्श्वभूमीवर गावात विविध उपाययोजना केल्या जात आहे. गावात डेंग्यू , मलेरियाचे रुग्ण व इतर साथीचे आजारांनी चांगलेच डोके वर काढू लागले आहे. तसेच रुग्ण संख्या दिवसेंदिवस वाढू लागली आहे. त्यादुष्टीने सामजिक कार्यकर्ते तथा शिवसेना नंदुरबार तालुका संघटक जगदिश पाटील यांनी शिवसेनेच्या २० टक्के राजकारण व ८० टक्के समाजकारण या तत्वा प्रमाणे यांनी व गावातील तरुणांकडून चौकाचौकात धुरळणी करण्यात आली आहे. या उपक्रमाचे गावकऱ्यांकडून या तरुणांचे सर्वत्र कौतुक करण्यात येत आहे.