नंदूरबार l प्रतिनिधी
आमदारांची वारी आपल्या दारी उपक्रमांतर्गत अक्कलकुवा तालुक्यातील जनतेच्या गाऱ्हाणे आणि तक्रारी सोडवण्यासाठी दि. 7 जुन रोजी अक्कलकुवा येथे जनता दरबाराचे आयोजन करण्यात आले आहे.
विधान परिषदेचे सदस्य आमदार आमश्या पाडवी यांच्या संकल्पनेतून आमदाराची वारी आपल्या दारी या उपक्रमांतर्गत सामान्य जनतेच्या विविध समस्या सोडविण्यासाठी दि.7 जुन रोजी अक्कलकुवा तहसील कार्यालयात जनता दरबाराचे आयोजन करण्यात आले आहे या जनता दरबारात तालुक्यातील सर्व विभागांचे वरिष्ठ अधिकारी त्यांचे अधिनस्त कर्मचारी हे उपस्थित राहुन आपल्या विभागाचा आढावा सादर करणार आहेत.
त्यामुळे जनता दरबारात येणाऱ्या सामान्य नागरिकांच्या विविध समस्या व त्यांचे म्हणणे ऐकुन जागेवर त्यांच्या समस्या व प्रश्न देखील सोडविण्यात येणार आहेत त्यामुळे या जनता दरबारात जास्तीत जास्त नागरिकांनी उपस्थित राहून आपल्या समस्या सोडवून घ्याव्यात असे आवाहन शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे गटाचे जिल्हा संघटक लक्ष्मण वाडीले यांनी केले आहे.








