नंदुरबार l प्रतिनिधी
प्रसिद्ध शिवकथाकार पंडित प्रदीप मिश्रा यांच्या संकल्पनेतून नगरपरिषदेच्या वतीने निर्माल्य संकलनासाठी स्वतंत्र वाहनाची व्यवस्था करण्यात आली आहे.निर्माल्य संकलनाचे वाहन आठवड्यातून एक वेळा घरोघरी व प्रत्येक मंदिरांपर्यंत येईल त्यात नागरिकांनी निर्माल्य टाकावे. स्वतंत्र निर्माल्याचे गाडीसाठी माजी नगराध्यक्ष सौ.रत्ना रघुवंशी यांनी पालिकेकडे पाठपुरावा केला होता.

नंदुरबार येथील छत्रपती मल्टी स्पेशालिस्ट हॉस्पिटलच्या उद्घाटन प्रसंगी पंडित प्रदीप मिश्रा यांच्या शिव चर्चा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. त्याप्रसंगी त्यांनी माजी नगराध्यक्ष सौ.रत्ना रघुवंशी यांना शहरात महिला भाविकाच्या विनंतीनुसार निर्माल्य संकलनासाठी गाडीची व्यवस्था करण्याचे सूचित केले होते. निर्मल्याचे पावित्र्य जपावे म्हणून दखल घेत माजी नगराध्यक्ष सौ.रत्ना रघुवंशी यांनी मुख्याधिकाऱ्यांना ही बाब लक्षात आणून दिली.
अनेक नागरिक देवपूजा झाल्यानंतर निर्माल्य कचऱ्याच्या गाडीत टाकत होते तसेच इतरत्र ठिकाणी फेकण्यात येत असल्याचे निदर्शनास आले होते. त्यामुळे कोणाच्याही धार्मिक भावनांना ठेच पोचू नये म्हणून पालिका प्रशासनाने देव पूजेचे निर्माल्य संकलनासाठी स्वतंत्र गाडीची व्यवस्था केली आहे. नागरिकांनी घरातील व मंदिरांमधील निर्माल्य इतरत्र न फेकता ते पालिकेच्या निर्माल्य संकलन गाडीतच टाकावे असे आवाहन मुख्याधिकारी अमोल बागुल यांनी केले आहे.
निर्माल्य संकलनासाठी असा असेल मार्ग
सोमवार
संभाजी नगर,होलारवाडा, चित्ते नगर, वृंदावन कॉलनी, वेडूगोविंद नगर, दशरथ नगर, एम. एल. टाउन, बापू नगर, वैशाली नगर, योगेश्वर कोलना हरीओम कॉलनी, बिजासनी कॉलनी, पायल नगर, कस्तूरी नगर, एकता म्हाडा, एकला नगर, आकाश मोगरा कॉलनी, कल्याणी पार्क, सोमेश्वर नगर खंडेराव पार्क, द्वारका नगर, खंडेलवाल टाऊन, खुशाल पार्क, राजेंद्र नगर, शाहू नगर, तुलसी विहार सिटी पार्क, मोदक नगर, तिरुपती नगर, प्रीन पार्क, महा नर्मदा नगर, बेथेल कॉलनी, नवी सिंधी कॉलनी, नागाई नगर, जयहिंद कॉलनी, रामदेव नगर ईश्वर कॉलनी, ठाकुरसिंग बाबा नगर, सरोज नगर, मंथन पार्क, आदर्श नगर, गणपती नगर, नंदनवन सो, वेणु गोपाल नगर, अरविंद नगर, कन्हैय्या नगर, लालबहादुर शास्त्री नगर, सेवकराम नगर, बाबा गणपती नगर, शिरीष कुमार नगर, व्यंकटेश नगर, दंडपाणेश्वर नगर, गणेश नगर, नमस्कार कॉलनी, माहिनीराज नगर, मदन मोहन नगर, मनमोहन नगर माँ बिहार, श्रीराम कॉलनी
मंगळवार
उत्तमभाई चाळ, बर्फ कारखाना परीसर, गायत्री नगर, महाबीर कॉलनी, दादावाडी आदेश्वर नगर, सरस्वती कॉलनी, विमल विहार, भुवनेश्वर नगर, सरगम कॉलनी,दत्त कॉलनी, रवि मोहन पार्क, माडा कॉलनी, फकिरा शिंदे नगर, पशुपतीनाथ हुडको, हडको बिल्डींग परीसर, हुडको फायर स्टेशन, सुरज केसरी नगर, बन्सीलाल नगर, रामचंद्र नगर, अमर कॉलनी, भगवती नगर, धर्मशाली नगर, गुरुनानक सोसायटी, मदर टेरेसा हुडको, शिक्षक कॉलनी, जुनी सिंधी कॉलनी, गिरीबिहार सोसायटी, स्वामी समर्थ कॉलनी, जमनादास पार्क, नाकोडा नगर, जयचंद नगर, ओम शांती नगर, धर्मराज नगर, अरिहंत नगर, शंकर नगर, द्वारका नगर, देवकी नगर, प्रशांत नगर, मनुदेवी पार्क, अवधुत पार्क, राजेश्वरी नगर
बुधवार
बाहेरपुरा, भरवाड गल्ली, मेहतर बस्ती, गोंधळी गल्ली, पोलीस लाईन, समता कॉलनी, मोती नाला परिसर, गुजर गल्ली, महाराष्ट्र व्यायाम शाळ परिसर बालाजी वाडा, ठेकेदार बिल्डींग, टिळक रोड परिसर, सातपौर गल्ली, कोहिनूर टॉकीज रोड, बाबा गणपती परिसर, माळीवाडा, लहान माळीवाडा, धानोरा नाका परिसर, गंधार हट्टी मिलाटी, सावता मंदिर परिसर, शिवाजी नगर
गुरुवार
मोठा मारुती, दादा गणपती, भोई गल्ली, मराठा गलनी, देसाईपुरा, अमृत चौक, रायसिंगपुरा, तैलिक वाडी, अमर टॉकीज, देसाईपुरा भिलाटी गवळीवाडा, संजय नगर, आंबेडकर चौक, चव्हाण चौक, जळका बाजार, कुंभारवाडा
शुक्रवार
धी बाजार, शास्त्री मार्केट परीसर, कुंभार गल्ली, जयवंत चौक, बागडी हॉटेल चौक, चौधरी गल्ली, भार गल्ली, चप्पल बाजार, कोहिनुर टॉकीन साक्री नाका, जोशी वाडा
शनिवार
टेलिफोन कॉलनी, रघुवंशी नगर, रघुकूल नगर, गिरीकुंज सोसायटी, जीटीपी मिलाटी, शांती नगर, सरस्वती नगर, वर्धमान नगर, शारदा नग वाघेश्वरी कॉलनी, हरीओम कॉलनी, आँका कॉलनी, लालबाग कॉलनी, विद्या नगर, गणेश नगर, बिरसावरकर नगर, नंदनगरी सोसायटी, माणि नगर, मेघ नगर, नेहरू नगर, गोपाल नगर, एलिझा नगर, तैय्यबी नगर, ज्ञानदीप सोसायटी, नेहा पार्क, जयंतीलाल नगर, योगेश्वर नगर पचावती नगर
रविवार
शिवाजी कॉलनी, लोकमान्य कॉलनी, म्हाडा कॉलनी, पोस्ट ऑफिस परीसर, परदेशीपुरा, जे. पी. एन क्वार्टर, एस. टी. स्टैन्ड बसाहत, विरल बिहार, नम क्वॉर्टर, कंजरवाडा, कामनाय नगर, लक्ष्मीनारायण नगर रॉयल पार्क, काका साहेब नगर, महाराणा प्रताप नगर, अनिल नगर, शुभम पार्क, गोल सिटी, सहारा टाऊन, शाहबाई नगर, शाहबाई नगर, समाई नगर, हिंगलाज माता नगर, राम नगर, हरीभाऊ नगर, सोनाबाई नगर, सोनाई नगर, देवर नगर गाधी नगर, रा. गाधी नगर, भोणा फाटा








