नंदुरबार l प्रतिनिधी
नंदूरबार शहरातील अतिक्रमणाचा मुद्या कडे लक्ष देत नंदुरबार नगरपरिषदेच्या मुख्याधिकारी पदाचा पदभार स्वीकारलेले परिविक्षाधीन अधिकारी पुलकित सिंग यांनी अवघ्या एका महिन्यात अनेक चौफुल्या अतिक्रमण मुक्त केले.अवघ्या एका महिन्यात छाप सोडल्यानंतर त्यांची अक्कलकुवा येथे बदली झाली होती.
आता पुन्हा त्यांची नंदुरबारयेथे परिविक्षाधीन तहसीलदारपदी म्हणून नंदुरबार पुलकित सिंग यांची नियुक्ती झाली आहे.
12 जून 2023 ते 14 जुलै 2023 या एका महिन्याच्या कालावधीसाठी पुलकित सिंग हे नंदुरबारचे तहसीलदार म्हणून पदभार स्वीकारतील. या ठिकाणी त्यांच्या धडाकेबाज कार्यपद्धतीने कामगिरी पहावयास मिळणार आहे. ही नियुक्ती विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी केली असून तसा आदेश ही जारी केला आहे.








