नंदूरबार l प्रतिनिधी
महाराष्ट्र विधान परिषदेचे सदस्य आ.आमश्या पाडवी यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेऊन हुणाखाब ता.अक्कलकुवा ग्रामपंचायतीच्या उपसरपंचांसह 7 ग्रामपंचायत सदस्यां सह शेकडो कार्यकर्त्यांनी आज शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटात जाहिर प्रवेश केला.
ग्रामपंचायत निवडणूकीच्या वेळी अक्कलकुवा येथील भारतीय जनता पक्ष युवा मोर्चाचे जिल्हा सरचिटणीस कुणाल जैन यांनी शिवसेनेत जाहिर प्रवेश केला होता.त्यावेळी त्यांचे समर्थक व पूर्वा श्रमीच्या सहकाऱ्यांनी शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षात प्रवेश करण्याचे अभिवचन दिले होते.
त्यानुसार युवा सेनेचे नेते कुणाल जैन यांच्या मार्गदर्शनाखाली हुनाखांब येथील कार्यकर्त्यांनी आ. आमश्या पाडवी यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवत शिवसेनेत जाहीर प्रवेश केला.यावेळी आ.आमश्या पाडवी यांनी कार्यकर्त्यांना शिवबंधन बांधुन पक्षात प्रवेश दिला.या प्रसंगी माजी सरपंच कान्हा नाईक , युवा सेनेचे युवा नेते कुणाल जैन, युवा सेना जिल्हा समन्वयक रोहित चौधरी , गोलू चंदेल, अविनाश बिऱ्हाड़े, संजय ठाकरे, अर्जून पाडवी, अशोक वसावे आदी मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते