नंदुरबार l प्रतिनिधी
महिला कुस्तीगीरांवर लैंगिक शोषणाचा आरोप असणाऱ्या भाजपा खासदार ब्रिजभुषण शरणसिंह यांना त्वरित अटक करावी अशी मागणी करीत सत्यशोधक ग्रामीण कष्टकरी सभेतर्फे तहसीलदारांना निवेदन देण्यात आले.
तहसीलदार भाऊसाहेब थोरात यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, भाजपाचे खासदार ब्रिज भूषण शरण सिंह यांनी गेल्या बारा वर्षे भारतीय कुस्ती महासंघाचे अध्यक्ष असताना महिला कुस्तीगिरांचे लैंगिक शोषण केल्याचा आरोप करिता जानेवारी रोजी त्यांचा राजीनामा मागणीसाठी दिल्लीच्या जंतरमंतरवर हरियाणातील महिला कुस्तीगिरांनी आपल्या पुरुष सहकाऱ्यांचा आंदोलन सुरू केले त्या आंदोलनात 23 जानेवारी रोजी चौकशी समिती नेमण्याचे घोषित करून हे आंदोलन गुंडाळ्यांचा प्रयत्न मोदी सरकारने केला. प्रत्यक्षात एफ आय आर आय नोंदवलेले असताना व एका अल्पवयीन कुस्तीगीर मुलीची तक्रार असताना ब्रिजभूषण शरण सिंह त्याने समाजात वावरत आहे.
कुस्तीगीर भगिनींना स्वतःवरील अन्यायाविरुद्ध दात काढण्यासाठी रस्त्यावर यावे लागते नव्या संसद भवनाचे उद्घाटन होण्या दिवशी प्रतिकात्मक महिला संसद भरून स्वतःवरील अन्यायाची गोष्ट जगाला सांगू इच्छिणाऱ्या या महिला व सहकारी पुरुष कुस्तीगीरांना दांडगाईने मोदी शहाच्या पोलिसांनी रात्रीच्या अंधारात अटक केली. या प्रकरणाची आता जागतिक कुस्तीगीर परिषदेने गंभीर दाखल घेतली आहे. शांततेने आंदोलन करणाऱ्या कुस्तीगीरांवर दिल्ली पोलिसांनी केलेल्या दडपशाहीचा सत्यशोधक ग्रामीण कष्टकरी सभा तीव्र निषेध करीत आहे.
देशातील शेतकऱ्यांसाठी लढणाऱ्या ५०० संघटनांचे प्रतिनिधित्व करणाऱ्या संयुक्त किसान मोर्चा ने एक ते सात जून पर्यंत कुस्तीगीरांना पाठिंबा देण्यासाठी देशव्यापी आंदोलनाचा निर्णय घेतला आहे सत्यशोधक शेतकरी सभा व श्रमिक शेतकरी संघटना संयुक्त किसान मोर्चाचा घटक म्हणून निवेदन सादर करीत आहे.
महिला कुस्तीगीरांच्या आंदोलन धडकण्याचा प्रयत्न आम्ही छत्रपती शिवाजी महाराज राजमाता जिजाऊ महात्मा फुले सावित्रीबाई फुले आदिवासी क्रांती वीरांगणा जलकारी बाई राजर्षी शाहू भारतरत्न बाबासाहेब आंबेडकर क्रांतिसिंह नाना पाटील या स्त्री-पुरुष समतावादी महामानवांचे वारसदार व संविधानिक मूल्यांना मानणारे शेतकरी आदिवासी स्त्री पुरुष कदापि सहन करणार नाही कुस्तीगिरांना त्वरित न्याय न मिळाल्यास अधिक तीव्र आंदोलनाचा इशारा निवेदनातून देण्यात आला आहे या निवेदनावर विक्रम गावित, बाबुराव ठाकरे, काशिनाथ कोकणी, मनोहर वळवी, किसन वळवी, जगन चव्हाण यांची नावे आहेत.