नंदूरबार l प्रतिनिधी
राष्ट्रमाता क्रांतीज्योती सावित्री आई फुले यांच्या बद्दल आक्षेपार्ह लिखाण केल्याबद्दल लेखका विरोधात दंडात्मक कारवाई व्हावी अशी मागणी जिल्हा आरपीआय आठवले पक्षाच्या युवक आघाडीने केली आहे.
याबाबत पोलीस अधीक्षक यांना निवेदन देण्यात आले.यात म्हटले आहे की,राष्ट्रमाता क्रांतीज्योती सावित्री आई फुले स्त्री शिक्षणाच्या जननी आहेत भारताच्या प्रथम महिला शिक्षिका आहेत स्त्रियांना मुलींना शिक्षण मिळावे यासाठी त्यांनी आपले संपूर्ण आयुष्य खर्च केले मुलींच्या तथा वंचित समाजातील वर्गासाठी त्यांनी शाळा बांधल्या शिक्षण वर्जित असलेल्या समाज घटकांना शिक्षण देत असताना तत्कालीन मनुवादी वृत्तीच्या लोकांकडून दगड धोंडे शेणाचे मातीचे प्रहार त्यांनी आपल्या अंगावर घेतले महिलांना मोफत शिक्षण दिले.समाजातील विषमता अनिष्ट चालीरीत कर्मकांड बालविवाह विरोध व विधवा विवाहाच्या पुरस्कार केला अशा कर्मवीर महान महिला समाज सुधारक विरोधात काही असलेल्या काही मनुवादी वृत्तीच्या पिल्लावळांनी इंडिका टेल्स या वेबसाईटवर आक्षेपार्ह व अतिशय अपमान कारक मजकूर प्रसारित केला आहे.
या वेबसाईटच्या व लेखकाचा नंदुरबार जिल्हा आरपीआय आठवले पक्षाच्या युवक आघाडी वतीने जाहीर निषेध नोंदविता तसेच या संतापजनक प्रकारामुळे बहुजन समाजाच्या तीव्र भावना दुखावल्या आहेत त्याबद्दल शासन प्रशासनाने या प्रकारची गांभीर्याने दखल घ्यावी इंडिका टेल्स या वेबसाईटवर बंदी आणावी तसेच लेखका विरोधात कायदेशीर दंडात्मक कारवाई करावी अशी मागणी करण्यात आले.या निवेदनावर जिल्हा आरपीआय आठवले पक्षाच्या युवक आघाडीचे जिल्हाध्यक्ष सुभाष पानपाटील यांच्या सह कार्यकर्त्यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.








