Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

काय सांगता: खा.अमोल कोल्हे यांचे नाव सांगून पोलिसांना फसविणाऱ्या भामट्याविरुद्ध गुन्हा दाखल

team by team
June 2, 2023
in क्राईम
0
काय सांगता: खा.अमोल कोल्हे यांचे नाव सांगून पोलिसांना फसविणाऱ्या भामट्याविरुद्ध गुन्हा दाखल

नंदूरबार l प्रतिनिधी

 

नंदूरबार येथे खासदार अमोल कोल्हे यांचे पी. ए. यांचे नाव सांगून पोलिसांना अपघाताबाबतची खोटी माहीती देवून पोलिसांची आर्थिक फसवणूक केल्याप्रकरणी एका विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, दि. 1 जून 2023 रोजी पोलीस अधीक्षक पी. आर. पाटील यांना त्यांचे मोबाईल क्रमांकावर अज्ञात मोबाईल क्रमांक 09373939113 यावरुन काहीतरी काम असल्याचा रात्री ११ वा. एस.एम.एस आला. त्यानी तात्काळ त्यांचे जनसंपर्क अधिकारी पोलीस उप निरीक्षक हेमंत मोहीते यांना मदत करण्यास सांगीतले. त्याअन्वये पी.एस.आय मोहिते यांनी तात्काळ नमुद मोबाईल क्रमांकावर कॉल केला असता, कॉलर यांनी त्यांचे नाव प्रबोध चंद्र सावंत असे सांगून ते खा.अमोल कोल्हे यांचे स्विय सहाय्यक असल्याबाबत कळविले व त्यांच्या मतदार संघातील लोकांच्या एका वाहनाचा शहादा येथे अपघात झाला असल्याचे सांगून त्यांना तातडीने मदत करावी म्हणून सांगितले. तसेच त्यांनी दिलेला मोबाईल

 

 

क्र.09834395809 यावर पी.एस.आय मोहिते यांनी तात्काळ संपर्क केला असता सदर कॉलर याने त्याचे नाव रविकांत मधुकर फसाळे असे कळवून त्यांच्या बोलेरो वाहनाचा शहादा येथे अपघात होवून 4 लोक मयत झाले असून 7 ते 8 लोक जखमी असुन त्यांच्यावर नंदुरबार येथे शासकीय रुग्णालयात उपचार चालू आहेत असे सांगितले. त्याबाबत नियंत्रण कक्ष यानी तातडीची मदत होण्याकामी माहिती घेतली असता असा अपघात झाला नसल्याचे समजले. त्यानंतर सदर मोबाईल क्र. 09834395809 यांनी पुन्हा पी.एस.आय मोहिते यांना कॉल करून त्यांना तात्काळ अम्ब्युलन्सने शिवाजीनगर पुणे येथे जाणे असल्याने वाहनात डिझेलसाठी 7 हजार रुपयांची आवश्यकता असल्याचे सांगीतले.

 

 

ही बाब खा. यांचे पी. ए. प्रबोध चंद्र सावंत यांना सांगितली तसेच पोलीस मदत देत असल्याचे सांगितले. त्यानंतर पुन्हा रविकांत मधुकर फसाळे यांनी पी.एस.आय मोहिते यांना थोड्या वेळाने पुन्हा कॉल करून सांगितले की, सकाळपासून काहीही खाल्ले नाही उपाशी आहोत, कृपया आम्हाला जेवणासाठी 2 हजार रुपयांची मदत करावी, जेणेकरून ते प्रवासादरम्यान काहीतरी जेवण करतील.

 

पी.एस.आय मोहिते यानी खासदार यांचे पी. ए. प्रबोध चंद्र सावंत यांना विचारले. त्यांनी अपरात्र असल्याने व दूर प्रवास करणे असल्याने तसेच खा. अमोल कोल्हे यांचा मदत करण्याबाबतचा निरोप आहे असे सांगितले. पी.एस.आय मोहिते यांनी माणूसकीच्या नात्याने कॉलर नाम मोबाईल क्र. 09834395809 धारक रविकांत मधुकर फसाळे याचे फोन पे अकाऊंटवर 1 हजार रुपयांची मदत पाठविली.
आज सकाळी दि. 2 जुन रोजी पी.एस.आय मोहिते यांनी नियंत्रण कक्षामार्फत खात्री केली असता अशा प्रकारची अपघाताची घटना ही नंदुरबार जिल्हा हद्दीत तसेच आजुबाजुच्या जिल्ह्यात देखील घडलेली नसल्याचे समजले. त्यामुळे अनोळखी मोबाईल क्र.09834395809 धारक रविकांत मधुकर फसाळे यांनी खासदार अमोल कोल्हे यांचे पी. ए. प्रबोध चंद्र सावंत यांचे नाव सांगून पोलिसांना अपघाताबाबतची खोटी माहीती देवून पोलिसांची आर्थिक फसवणूक केली.

 

तसेच पोलीस खात्याला अपघाताबाबत खोटी माहीती देवून विनाकारण कामाला लावून शासकीय कामकाजाचा वेळ वाया घालवला आहे. याबाबत नंदुरबार शहर पोलिस ठाण्यात भादवी कलम भा.द.वि. कलम 420, 182 सह माहीती तंत्रज्ञान अधिनियम 2000 चे कलम 66(ड) अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

बातमी शेअर करा
Previous Post

दिव्यांगाच्या अडचणी सोडविण्यासाठी ‘दिव्यांग कल्याण विभाग दिव्यांगांच्या दारी अभियान’

Next Post

एस.एस.सी.बोर्ड परीक्षेत 98.80 टक्के मिळून रेवती माळी जिल्ह्यात प्रथम

Next Post
एस.एस.सी.बोर्ड परीक्षेत 98.80 टक्के मिळून रेवती माळी जिल्ह्यात प्रथम

एस.एस.सी.बोर्ड परीक्षेत 98.80 टक्के मिळून रेवती माळी जिल्ह्यात प्रथम

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

आ. डॉ. विजयकुमार गावित यांच्या प्रकृतीत लवकर सुधारणा व्हावी यासाठी डॉ.हिना गावित यांची शनिदेवाला साकडे

आ. डॉ. विजयकुमार गावित यांच्या प्रकृतीत लवकर सुधारणा व्हावी यासाठी डॉ.हिना गावित यांची शनिदेवाला साकडे

March 19, 2026
तब्बल तीन महिन्यांनी नंदुरबार जिल्ह्याला मिळाले पालकमंत्री, हसन मुश्रीफ यांची नियुक्ती

तब्बल तीन महिन्यांनी नंदुरबार जिल्ह्याला मिळाले पालकमंत्री, हसन मुश्रीफ यांची नियुक्ती

March 19, 2026
नवजात मुलीला रुग्णालयातच सोडून आई फरार; पोलिसांकडून शोधमोहीम तीव्र

नवजात मुलीला रुग्णालयातच सोडून आई फरार; पोलिसांकडून शोधमोहीम तीव्र

March 19, 2026
आगामी सण-उत्सवांच्या पार्श्वभूमीवर जिल्हास्तरीय शांतता समितीची बैठक

आगामी सण-उत्सवांच्या पार्श्वभूमीवर जिल्हास्तरीय शांतता समितीची बैठक

March 18, 2026
दिव्यांग लाभार्थ्यांच्या अनुदानात वाढ, 20 मार्चपर्यंत कागदपत्रे सादर करावे

दिव्यांग लाभार्थ्यांच्या अनुदानात वाढ, 20 मार्चपर्यंत कागदपत्रे सादर करावे

March 18, 2026
पाणी पुरवठा योजनेच्या शाश्वततेसाठी ग्रामस्थांमध्ये स्वमालकीची भावना गरजेची : आ.आमश्या पाडवी

पाणी पुरवठा योजनेच्या शाश्वततेसाठी ग्रामस्थांमध्ये स्वमालकीची भावना गरजेची : आ.आमश्या पाडवी

March 18, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add