नंदूरबार l प्रतिनिधी
कृषी उत्पन्न बाजार समितीच्या पाठोपाठ तळोदा तालुका सहकारी खरेदी विक्री संघ मर्या. तळोदा जि. नंदुरबार संस्थेचा चेअरमनपदी गोविंदभाई पाटील तर व्हाईस चेअरमनपदी पूरूषोत्तम चव्हाण यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे.
तळोदा तालुका सहकारी खरेदी विक्री संघाच्या संचालक मंडळाची निवडणूक गेल्या महिन्यात घेण्यात आली होती त्यामुळे चेअरमन व व्हॉईस चेअरमन या पदाधिकाऱ्यांच्या निवडीसाठी शुक्रवारी संघाच्या कार्यालयात निवडणूक निर्णय अधिकारी तथा सहाय्यक उपनिबंधक सचिन खैरनार यांच्याउस्थितीत बैठक घेण्यात आली.
यावेळी चेअरमन पदासाठी गोविंद पुरुषोत्तम पाटील व व्हॉईस चेअरमन पदासाठी पुरुषोत्तम रामदास चव्हाण या दोघांचे च अर्ज दाखल करण्यात आले होते. इतर कोणीही संचालकाने अर्ज दखल न केल्याने निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी दोघं पदाधिकाऱ्यांची बिनविरोध निवड जाहीर करण्यात आली. यापूर्वीच सतरा जागांसाठीचे संचालक मंडळ बिनविरोध झाले आहे. यावेळी पुरुषोत्तम रामदास चव्हाण, संजय श्रीपद पटेल, नितीन सखाराम पाटील, सुरेश दत्तात्रय पाटील, कांतीलाल राजाराम भापकर, चंदू हरि भोई, अरुण नथू मगरे, विलास कृष्णा लोखंडे, संजीव रमेश चौधरी, गोविंद पुरुषोत्तम पाटील, जितेंद्र रघुनाथ पाटील, सुभाष रामदास पाटील, पूनमचंद ओंकारचंद भील, आशाबाई सुभाष पटेल, सुरेखा मुरलीधर सागर, भरत कांतीलाल पाटील, अविनाश प्रल्हाद भारती उपस्थित होते.
याप्रसंगी माजी आमदार उदेसिग पाडवी यांनी संचालक मंडळाला मार्गदर्शन करतांना सांगितले की, तालुक्याचा सहकार क्षेत्रात कृषी उत्पन्न बाजार समिती व तळोदा तालुका सहकारी खरेदी विक्री संघ या दोन प्रमुख संस्था आहे. सदर संस्था ह्या शेतकऱ्यांशी निगडित आहेत. त्यामुळे त्यांचा विकास म्हणजेच शेतकऱ्यांचा विकास आहे. सहाजिकाच या संस्थांचा विकासासाठी संचालक मंडळाने अथक परिश्रम घेण्याचे आवाहन केले.
यावेळी कृष्री उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती हितेंद्र क्षत्रिय, राष्ट्रवादी चे शहराध्यक्ष योगेश मराठे, केसरसिंग क्षत्रिय, गुलाबसिंग गिरसे, गोपाळ पाटील, ब्रिजलाल चव्हाण, शरद पाटील, प्रकाश शिंदे, संजय नवले, धर्मराज पवार, राजाराम पाटील, उपस्थित होते. निवडणुकीसाठी संस्थेचे व्यवस्थापक योगेश चौधरी,सहा.व्य.सुधीर शिंदे, अजित पवार, पर्बत पाडवी, राजेंद्र पिंप्रे यांनी परिश्रम घेतले.








